IPL 2022 RCB VS RR :  आयपीएलच्या 15 व्या मोसमातील तेरावा सामना आज रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु (RCB) आणि राजस्थान रॉयल्स (RR) यांच्यात होणार आहे. हा सामना मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर संध्याकाळी साडेसात वाजता सुरु होईल. एकीकडे नाणेफेक गमावूनही राजस्थानने दोन्ही सामने जिंकले आहेत, तर बंगळुरुला एक विजय मिळाला असून एका पराभवाचा सामना करावा लागला आहे. आरसीबीसाठी पहिला सामना जिंकणारा कार्तिक आजच्या सामन्यात ट्रम्प कार्ड ठरू शकतो. यंदाच्या हंगामात जोस बटलर, संजू सॅमसन आणि दिनेश कार्तिक यांनी धमाकेदार बॅटींग केली आहे. 


राजस्थान गुणतालिकेत अव्वल


राजस्थान रॉयल्स सध्या गुणतालिकेत अव्वल स्थानी आहे. राजस्थानने आतापर्यंतच्या लढलेले दोन्ही सामने जिंकले आहेत. राजस्थानने सनरायझर्स हैदराबाद आणि मुंबई इंडियन्सविरुद्धच्या दोन्ही सामन्यात विजय मिळवला आहे. तर दुसरीकडे बेंगलोरचा एका सामन्यात विजय आणि एका सामन्यात पराभव झाला आहे. बेंगलोरने त्यांचा पहिला सामना पंजाब किंग्सविरुद्ध झाला होता. त्यात त्यांना ५ विकेट्सने पराभव पत्करावा लागला. त्यानंतर त्यांनी कोलकाता नाईट रायडर्सचा सामना केला. त्यात त्यांना ३ विकेट्सने विजय मिळवता आला. बेंगलोर गुणतालिकेत सातव्या स्थानी आहेत. 


आरसीबीच्या संघात बदल
आरसीबीच्या संघात मोठा बदल करण्यात आला आहे. दुखापतीमुळे लवनीथ सिसोदीया हंगामातून बाहेर पडला आहे आहे. सिसोदीयाला संपूर्ण हंगामापासून मुकावं लागणार आहे. त्यामुळे टीममध्ये त्याच्या जागी रजत पाटीदारचा (Rajat Patidar) समावेश करण्यात आला आहे.


महत्त्वाच्या बातम्या :



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha