RR vs KKR, Match Live Update : IPL 2022: राजस्थानचा कोलकात्यावर सात धावांनी विजय

IPL 2022 : आज राजस्थान रॉयल्स आणि कोलकाता नाईट रायडर्स हे दोन्ही संघ स्पर्धेतील चौथ्या विजयासाठी मैदानात उतरणार आहेत.

abp majha web team Last Updated: 18 Apr 2022 11:38 PM
राजस्थानचा कोलकात्यावर सात धावांनी विजय

मुंबईच्या (Mumbai) ब्रेबॉर्न स्टेडिअमवर (Brabourne Stadium) खेळण्यात आलेल्या सामन्यात राजस्थान रॉयल्सनं कोलकाता नाईट रायडर्सला 7 धावांनी पराभूत केलंय. या सामन्यात नाणेफेक जिंकून कोलकाताच्या संघानं प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर प्रथम फलंदाजी करण्यासाठी मैदानात आलेल्या राजस्थानच्या संघानं 20 षटकात 5 विकेट्स गमावून 217 धावा केल्या आहेत. प्रत्युरात कोलकात्याच्या संघ 210 धावांवर आटोपला. 

IPL 2022: कर्णधार श्रेयस अय्यरचं अर्धशतक

राजस्थाननं दिलेल्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरलेल्या कोलकात्याच्या संघाची सुरुवात खराब झाली. त्यानंतर सलमीवीर आरोन फिंच आणि श्रेयस अय्यरनं अर्धशतक ठोकून संघाचा डाव सावरला आहे. 


 

RR vs KKR : 5 षटकानंतर केकेआर 43/1

केकेआरच्या इनिंगची पाच षटकं पूर्ण झाली असून त्यांची धावसंख्या 43 वर एक बाद आहे. सध्या फिंच आणि अय्यर फलंदाजी करत आहेत.

RR vs KKR : केकेआरची खराब सुरुवात, नारायण धावचीत

218 ही विशाल धावसंख्या पार करण्यासाठी मैदानात आलेल्या केकेआरचा सलामीवीर सुनील नारायण शून्यावर बाद झाला आहे. हीटमायरने त्याला धावचीत केलं आहे.

RR vs KKR : हीटमायरकडून अखेरच्या षटकात फटेबाजी, केकेआरला 218 धावाचं आव्हान

शिमरॉन हीटमायरने अखेरच्या षटकात दोन षटकार, एक चौकार ठोकल्याने राजस्थानने 217 धावा स्कोरबोर्डवर लावल्या आहेत. त्यामुळे आता केकआरला विजयासाठी 218 धावांचे आव्हान आहे.

RR vs KKR : 18 षटकानंतर राजस्थान 194/4

18 षटकं संपली असून राजस्थान संघाने 4 गडी गमावत 194 धावा केल्या आहेत.

RR vs KKR : बटलर नावाचं वादळ थांबलं

जोस बटलर अखेर 103 धावा करुन बाद झाला आहे. पॅट कमिन्सने त्याची विकेट घेतली आहे.

RR vs KKR : बटलरचं शतक पूर्ण

जोस बटलरने आजही दमदार कामगिरी करत यंदाचं दुसरं शतक ठोकलं आहे. 59 चेंडूत त्याने 102 धावा ठोकत शतक पूर्ण केलं आहे.

RR vs KKR : रसेलने घेतली संजूची विकेट

राजस्थानचा कर्णधार संजू सॅमसन 38 धावा करुन तंबूत परतला आहे. आंद्रे रसेलच्या चेंडूलवर मावीने त्याचा झेल घेतला आहे.

RR vs KKR : राजस्थानची तुफान खेळी 14 षटकात 148 धावा

राजस्थान संघाने तुफान खेळी सुरुच ठेवली आहे. त्यांनी 14 षटकात 148 धावांपर्यत मजल मारली आहे. सध्या बटलर 88 तर संजू 25 धावांवर खेळत आहे.

RR vs KKR : राजस्थानला पहिला झटका, देवदत्त बाद

राजस्थानचा सलामीवीर देवदत्त पडिक्कल सुनील नारायणच्या चेंडूवर बाद झाला आहे.

RR vs KKR : बटलरचं धडाकेबाज अर्धशतक

राजस्थान संघाला आजही जोस बटलरने चांगली सुरुवात करुन दिली आहे. त्याने नुकतचं त्याचं अर्धशतक पूर्ण केलं आहे.

RR vs KKR : राजस्थानची दमदार सुरुवात

राजस्थान संघाने दमदार सुरुवात केली असून जौस बटलर तुफान फटकेबाजी करत आहे.

RR vs KKR : कोलकाता अंतिम 11  

 अजिंक्य रहाणे, व्यंकटेश अय्यर, श्रेयस अय्यर (कर्णधार), शेल्डॉन जॅक्सन (विकेटकीपर), नितीश राणा, आंद्रे रसेल, सुनील नारायण, पॅट कमिन्स, उमेश यादव, शिवम मावी, वरुण चक्रवर्ती.

RR vs KKR : राजस्थान अंतिम 11  

जोस बटलर, देवदत्त पडिक्कल, करुण नायर, संजू सॅमसन (कर्णधार,विकेटकीपर), शिमरॉन हेटमायर, रियान पराग, प्रसिध कृष्णा, रवीचंद्रन अश्विन, ओबेद मकॉय, ट्रेंट बोल्ट, युझवेंद्र चहल.


 

RR vs KKR : कोलकात्याने नाणेफेक जिंकत निवडली गोलंदाजी

नुकतीच नाणेफेक झाली असून केकेआरने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.

RR vs KKR: संजू सॅमसन 5 हजार धावांजवळ

राजस्थानचा कर्णधार संजू सॅमसननं टी-20 क्रिकेटमध्ये 4951 धावा केल्या आहेत. यामुळं टी-20 क्रिकेटमध्ये पाच हजार धावांचा टप्पा गाठण्यासाठी त्याला केवळ 49 धावांची आवश्यकता आहे. याशिवाय संजू सॅमसननं आयपीएलमध्ये एकूण 142 षटकार मारले आहेत. 150 षटकारांचा टप्पा गाठण्यासाठी त्याला 8 षटकारांची गरज आहे. 

IPL : आयपीएलला झाली 15 वर्षे

जगातील सर्वात भव्य अशी क्रिकेट लीग म्हणजे इंडियन प्रिमीयर क्रिकेट लीग अर्थात आयपीएल (IPL). जगातील प्रत्येक क्रिकेटपटूचं स्वप्न असतं या स्पर्धेत खेळण्याचं. आज याच महान क्रिकेट स्पर्धेला 15 वर्षे झाली असून 2008 मध्ये या स्पर्धेचा पहिला सामना आजच्याच दिवशी खेळवण्यात आला होता. बंगळुरुच्या एम. चिन्नस्वामी मैदानात कोलकाता नाईट रायडर्स आणि रॉयल चँलेजर्स बंगळुरु (KKR vs RCB) या दोन संघात हा सामना पार पडला होता.  

RR vs KKR : कोलकाता संभाव्य अंतिम 11  

अजिंक्य रहाणे, व्यंकटेश अय्यर, श्रेयस अय्यर (कर्णधार), सॅम बिलिंग्ज (विकेटकीपर), नितीश राणा, आंद्रे रसेल, सुनील नारायण, पॅट कमिन्स, उमेश यादव, रसिख सलाम, वरुण चक्रवर्ती.

RR vs KKR : राजस्थान संभाव्य अंतिम 11  

जोस बटलर, यशस्वी जैस्वाल, देवदत्त पडिक्कल, संजू सॅमसन (कर्णधार,विकेटकीपर), शिमरॉन हेटमायर, रियान पराग, प्रसिध कृष्णा, रवीचंद्रन अश्विन, कुलदीप सेन, ट्रेंट बोल्ट, युझवेंद्र चहल.


 

RR vs KKR : राजस्थान संभाव्य अंतिम 11  

जोस बटलर, यशस्वी जैस्वाल, देवदत्त पडिक्कल, संजू सॅमसन (कर्णधार,विकेटकीपर), शिमरॉन हेटमायर, रियान पराग, प्रसिध कृष्णा, रवीचंद्रन अश्विन, कुलदीप सेन, ट्रेंट बोल्ट, युझवेंद्र चहल.


 

RR vs KKR : आजची लढत राजस्थान विरुद्ध कोलकाता

यंदाच्या आयपीएलमधील आजचा 30 वा सामना राजस्थान रॉयल्स आणि कोलकाता नाईट रायडर्स  (RR vs KKR) या दोन संघामध्ये पार पडत आहे. दोन्ही संघानी यंदाच्या हंगामात आतापर्यंत प्रत्येकी तीन सामने जिंकले आहेत. त्यामुळे आज चौथ्या विजयाची दोघांना प्रतिक्षा आहे.

पार्श्वभूमी

RR vs KKR, Live Score : आयपीएलमधील(IPL 2022) आजचा 30 वा सामना राजस्थान रॉयल्स आणि कोलकाता नाईट रायडर्स  (RR vs KKR) या दोन संघामध्ये पार पडत आहे. दोन्ही संघानी यंदाच्या हंगामात आतापर्यंत प्रत्येकी तीन सामने जिंकले आहेत. त्यात राजस्थानची कामगिरी यंदा उत्तम दिस आहे. कारण पर्पल तसंच आँरेंज कॅपच्या शर्यतीतही त्यांचे खेळाडू आघाडीवर आहेत. दुसरीकडे नवा कर्णधार मिळाल्यापासून केकेआरची कामगिरीही उत्तम दिसत आहे.


आयपीएलमध्ये आजवर राजस्थान रॉयल्स आणि कोलकाता नाईट रायडर्स हे संघ तब्बल 25 वेळा एकमेंकाविरुद्ध मैदानात उतरले आहेत. या सर्व सामन्यांचा विचार करता कोलकात्याचं पारडं काहीसं जड असून त्यांनी 13 सामन्यात विजय मिळवला आहे. तर दुसरीकडे राजस्थानला 11 सामने जिंकण्यात यश आलं आहे. तर एक सामना अनिर्णीत राहिला आहे.


कसा आहे पिच रिपोर्ट?


आजचा सामना मुंबईतील ब्रेबॉर्न स्टेडियम खेळवला जाणार आहे. खेळपट्टीचा विचार करता याठिकाणी दुसऱ्यांदा फलंदाजी करणाऱ्या संघाला फायदा होत आहे. समोर असणारे लक्ष्य पार करण्यात यश येत आहे. यामागील दव हे एक मोठे कारण आहे. सायंकाळच्या सामन्यात दुसऱ्या इनिंगमध्ये गोलंदाजी करणाऱ्या संघाला दवामुळे अडचण होत असल्याने फलंदाजी करणाऱ्यांना फायदा होत असल्याचे दिसून आले आहे.


राजस्थान अंतिम 11  


जोस बटलर, देवदत्त पडिक्कल, करुण नायर, संजू सॅमसन (कर्णधार,विकेटकीपर), शिमरॉन हेटमायर, रियान पराग, प्रसिध कृष्णा, रवीचंद्रन अश्विन, ओबेद मकॉय, ट्रेंट बोल्ट, युझवेंद्र चहल.


कोलकाता अंतिम 11  


अजिंक्य रहाणे, व्यंकटेश अय्यर, श्रेयस अय्यर (कर्णधार), शेल्डॉन जॅक्सन (विकेटकीपर), नितीश राणा, आंद्रे रसेल, सुनील नारायण, पॅट कमिन्स, उमेश यादव, शिवम मावी, वरुण चक्रवर्ती.


हे देखील वाचा-


- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.