KKR vs LSG : आज आयपीएलमध्ये (IPL 2022) कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध लखनौ सुपरजायंट्स (KKR vs LSG) हे संघ मैदानात उतरणार आहेत. कोलकात्याचं आव्हान याआधीच संपलं आहे. त्यामुळे ते केवळ शेवट गोड करण्यासाठी खेळतील. तर लखनौला पुढील फेरीत जाण्यासाठी आजची लढाई महत्त्वाची असेल. गुणतालिकेचा विचार करता लखनौने 13 पैकी 8 सामने जिंकत 16 गुणांसह तिसंर स्थान मिळवलं आहे. तर दुसरीकडे केकेआरने 13 पैकी 6 सामनेच जिंकल्याने 12 गुणांसह ते सहाव्या स्थानी आहेत.  


आजचा राजस्थान रॉयल्स (RR) आणि दिल्ली कॅपिटल्स (DC) यांच्यातील सामना नवी मुंबईच्या डी.वाय. पाटील मैदानावर होणार आहे. या मैदानावर मागील काही सामन्यांत गोलंदाजांनी कमाल कामगिरी केली. मुंबईच्या बुमराहने इथेच 5 विकेट्स घेत इतिहास रचला. त्याच सामन्यात केकेआरने मुंबईला अवघ्या 113 धावात ऑलआऊट केलं. त्यामुळे याठिकाणी वेगवान गोलंदाजांना मदत मिळत असल्याने लखनौला केकेआरचं आव्हान अवघड असेल. त्यामुळे दोघांचा सामना चुरशीचा होऊ शकतो. सामना सायंकाळी असल्यान दुसऱ्या डावात दव पडण्याची शक्यता आहे, पण मागील सामन्याचं पाहता आज नाणेफेक जिंकणारा नेमका कोणता निर्णय घेईल हे नाणेफेकीनंतरच स्पष्ट होईल.


कधी आहे सामना?


आज 18 मे रोजी होणारा कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध लखनौ सुपरजायंट्स हा सामना भारतीय वेळेनुसार सायंकाळी 7 वाजून 30 मिनिटांनी सुरु होईल. 7 वाजता नाणेफेक होईल.  


कुठे आहे सामना?


हा सामना नवी मुंबईच्या डी.वाय. पाटील मैदानावर खेळवला जाणार आहे.


कुठे पाहता येणार सामना?


कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध लखनौ सुपरजायंट्स हा आजचा सामना स्टार स्पोर्ट नेटवर्कवर पाहता येणार आहे. वेगवेगळ्या भाषेतून सामना पाहता येणार आहे. तसेच हॉटस्टार अॅपवरही सामना पाहता येईल. याशिवाय https://marathi.abplive.com//amp येथेही तुम्हाला आयपीएलचे लाईव्ह कव्हरेज पाहाता येईल. 


हे देखील वाचा-