RCB vs RR : आयपीएलमधील 2022 (IPL 2022) मधील आजच्या 39 व्या सामन्यात रॉयल चॅलेजर्स बंगळुरु आणि राजस्थान रॉयल्स (RCB vs RR) हे दोन्ही संघ आमने-आमने असून नुकतीच राजस्थानची फलंदाजी संपली आहे. त्यांनी बंगळुरुला 145 धावांचं आव्हान दिलं आहे. सामन्यात आरसीबीच्या चोख गोलंदाजीसमोर राजस्थानचे फलंदाज फेल ठरताना दिसत होते. पण युवा खेळाडू रियान पराग याने मात्र एकहाती झुंज देत नाबाद 56 धावांच्या जोरावर संघाला एका आव्हानात्मक लक्ष्यापर्यंत पोहोचवलं आहे.
सामन्यात रॉयल चँलेजर्स बंगळुरु (Royal challengers banglore) संघाचा कर्णधार फाफने आज नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. आरसीबीच्या गोलंदाजांनी सुरुवातीपासून अगदी चोख गोलंदाजी केली. त्यांनी सर्वात महत्त्वाचं म्हणजे रनमशिन जोस बटलरला स्वस्तात माघारी धाडलं. त्यांनी पडिक्कललाही रोखलं. संजूने काही काळ क्रिजवर टिकून राहत 27 धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली. ज्यामुळे संघाची धावसंख्या काही प्रमाणात वाढली.
रियानचं नाबाद अर्धशतक
संजू बाद झाल्यानंतर मात्र संघाच्या सर्व आशा युवा खेळाडू रियान परागच्या खांद्यावर आल्या. त्यानेही जबाबदारी चोखरित्या पार पाडत एक दमदार आणि संयमी अर्धशतक झळकावलं. त्याने 31 चेंडूत 3 चौकार आणि 4 षटकार ठोकत नाबाद 56 धावा झळकावल्या. ज्यामुळे संघाची धावसंख्या 140 च्या पुढे गेली. ज्यामुळे आता आरसीबीला विजयासाठी 145 धावा करायच्या आहेत.
आरसीबीची चोख गोलंदाजी
आरसीबी संघाने सुरुवातीपासून दमदार गोलंदाजी केली. यावेळी मोहम्मद सिराजने अतिशय महत्त्वाचे विकेट्स घेत क्षेत्ररक्षणही चांगलं केलं. आरसीबीकडून सिराज, हेझलवुड आणि हसरंगा यांनी प्रत्येकी दोन तर हर्षल पटेलने एक विकेट घेतली.
हे देखील वाचा-