CSK Fan Girl : मुंबईच्या वानखेडे स्टेडियममध्ये पंजाब किंग्स विरुद्ध चेन्नई सुपरकिंग्स (PBKS vs CSK) सामन्यात चेन्नईला पराभवाचा सामना करावा लागला. पण अंबाती रायडू याच्या तुफान फटकेबाजीमुळे सामना अत्यंत चुरशीचा झाला होता. दरम्यान अंबाती याने एका षटकात तीन दमदार षटकार खेचले होते. बरोबर त्याच वेळी कॅमेरामनने चेन्नईच्या फॅन्सचा आनंद कॅमेऱ्यात टीपताना एका तरुणीच्या सुंदर अदा देखील कॅमेऱ्यात कैद झाल्या आहेत. 


चेन्नई सुपर किंग्सचा संघ (CSK) पंजाब किंग्सने (PBKS) दिलेल्या 188 धावांचा पाठलाग करत असताना सुरुवातीचे फलंदाज फेल गेले. त्यानंतर अंबातीने क्रिजवर येत एक दमदार खेळी केली. यावेळी 16 वी ओव्हर सुरु असताना रायडूने 4 चेंडूपर्यंत तीन सलग षटकार खेचत 22 रन करुन टाकले. दरम्यान याच षटकारांच्या हॅट्रिक दरम्यान सीएसकेची एक फॅन गर्ल आनंदाने जणू नाचतच होती. त्याचवेळी तिच्या याच अदा चांगल्याच व्हायरल झाल्या आहेत. या फॅन गर्लचे फोटो आणि व्हिडीओ बरेच व्हायरल होत आहेत.


कोण आहे सीएसकेची फॅन गर्ल?


सामन्यादरम्यान झळकलेल्या या फॅन गर्लचं नाव श्रुती तुली (Shruti Tuli) असं असून ती पेशाने एक अॅक्टर असून सोशल मीडियावर तुफान सक्रिय आहे. सद्यस्थितीला 1 लाख 24 हजारच्या घरात तिचे फॉलोवर्स असून ती फॅशन, फिटनेस अशा गोष्टींमध्ये अधिक रस घेत असल्याचं तिचं सोशल मीडिया प्रोफाईल पाहून कळतं.


अखेर चेन्नई पराभूत


सामन्यात आधी फलंजाजी करणाऱ्या पंजाबने 187 धावा करत 188 धावांचे लक्ष्य चेन्नईसमोर ठेवले होते. हे पार करताना चेन्नईकडून अंबाती रायडूने एक दमदाऱ अशी 78 धावांची खेळी केली पण अखेर चेन्नईचा संघ 11 धावांनी पराभूत झाला. 188 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी मैदानात आलेल्या चेन्नई संघाचे फलंदाज सुरुवातीपासून चांगल्या फॉर्ममध्ये नव्हते. एक-एक फलंदाज बाद होत होता. ऋतुराजने काही काळ डाव सांभाळला पण तोही 30 धावा करुन बाद झाला. पण त्यानंतर क्रिजवर आलेल्या अंबाती रायडूने एका दमदार खेळीचं दर्शन घडवलं. त्याने 39 चेंडूत 7 चौकार आणि 6 षटकार ठोक 78 धावा केल्या. पण रबाडाने त्याचा महत्त्वपूर्ण विकेट घेत सामन्याची दिशा बदलली. अखेरच्या षटकापर्यंत गेलेल्या सामन्यात धोनीने एक चौकार आणि षटकार ठोकला खरा पण अखेरच्या षटकाच्या तिसऱ्या चेंडूवर धोनी बाद होताच, सामना चेन्नईकडून पंजाबच्या दिशेने झुकला. त्यानंतर जाड़ेजाने एक षटकार लगावला, पण तोवर फार उशीर झाला होता आणि हातात चेंडू शिल्लक नसल्याने चेन्नईने सामना 11 धावांनी गमावला.


हे देखील वाचा-