IPL 2022 : आयपीएलच्या 15 व्या हंगमात रोहित शर्माच्या नेतृत्वातील मुंबई इंडियन्सनची कामगिरी निराशाजनक झाली आहे. आतापर्यंत झालेल्या पाचही सामन्यात मुंबईला पराभवाचा सामना करावा लागला आहे. त्यामुळे गुणतालिकेत मुंबईचा संघ दहाव्या क्रमांकावर आहे. बुधवारी पंजाबविरोधात झालेल्या सामन्यात मुंबईचा 12 धावांनी पराभव झाला. या सामन्यानंतर मुंबईचा कर्णधार रोहित शर्माला आणखी एक धक्का बसला आहे. रोहित शर्माला 24 लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. 


मुंबईचा कर्णधार रोहित शर्माला स्लो ओव्हर रेटमुळे 24 लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. त्यासोबत रोहित शर्माला स्लो ओव्हर रेटसाठी इशाराही देण्यात आला आहे. याआधीही रोहित शर्माला स्लो ओव्हर रेटमुळे 12 लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला होता. आतापर्यंत झालेल्या पाच सामन्यात रोहित शर्माला दोन वेळा स्लो ओव्हर रेटमुळे दंड ठोठावण्यात आला आहे. 


पंजाबविरोधात रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. पंजाबने प्रथम फलंदाजी करताना कर्णधार मयांक अग्रवाल आणि शिखर धवन यांच्या अर्धशतकी खेळीच्या बळावर 198 धावांचे आव्हान दिले होते. या आव्हानाचा पाठलगा करताना मुंबईला 186 धावांपर्यंत मजल मारता आली. या सामन्यात रोहित शर्माने 17 चेंडूचा सामना करताना 28 धावांची छोटेखानी खेळी केली होती. या खेळीदरम्यान रोहित शर्माने दोन षटकार आणि तीन चौकार लगावले.  


मुंबईच्या पराभवानंतर रोहित शर्माला आर्थिक दंडाला सामोरं जावं लागले आहे. मर्यादित वेळेत 20 षटकं न संपल्यामुळे रोहित शर्मावर दंडाची कारवाई करण्यात आली आहे. यासोबतच रोहित शर्माला इशाराही देण्यात आली आहे. याआधाही रोहित शर्माला स्लो ओव्हर रेटमुळे 12 लाखांचा दंड आकारण्यात आला होता. यानंतर रोहित शर्माकडून अशी चूक झाल्यास एका सामन्याची बंदी घालण्यात येऊ शकते. 


आयपीएल 15 मधील मुंबईची कामगिरी - 
पहिला सामना - दिल्लीकडून चार विकेटने पराभव
दुसरा सामना - राजस्थान रॉयल्सचा 23 धावांनी विजय
तिसरा सामना - कोलकात्याचा पाच विकेटने विजय
चौथा सामना - आरसीबीचा सात गड्यांनी विजय
पाचवा सामना - पंजाबचा 12 धावांनी विजय