IPL 2022, RCB vs SRH : भारताचा दिग्गज फलंदाज विराट कोहली (Virat Kohli) आयपीएलच्या 15 व्या हंगमात निराशाजनक कामगिरी करताना दिसत आहे. विराट कोहलीला आपल्या लौकिकास साजेशी फलंदाजी करता आलेली नाही. यंदाच्या आयपीएलमध्ये आतापर्यंत झालेल्या सर्व सामन्यात विराटला आपली छाप सोडता आली नाही. कर्णधारपद सोडल्यानंतर विराट कोहलीला फॉर्म गवसला नाही.  कोहलीकडून चाहत्यांना मोठ्या खेळीची आपेक्षा आहे. पण आतापर्यंत झालेल्या सात सामन्यात कोहलीला फक्त 119 धावाच करता आल्यात. शनिवारी संध्याकाळी आरसीबीचा सामना लागोपाठ चार सामने जिंकणाऱ्या हैदराबादविरोधात आहे. या सामन्यात दमदार फलंदाजी करत पुन्हा फॉर्ममध्ये येणाचा विराटचा प्रयत्न असेल. पाहूयात हैदराबादविरोधात विराट कोहलीने आतापर्यंत कशी कामगिरी केली आहे. 


विराट कोहलीने हैदराबादविरोधात 18 सामन्यात 35.56 च्या सरासरीने 569 धावा चोपल्यात. हैदराबादविरोधात विराट कोहलीची सर्वोच्च धावसंख्या 96 आहे. विराट कोहलीने 137.43 च्या स्ट्राइक-रेट फलंदाजी करताना चार अर्धशतके झळकावली आहेत. 
 
प्रमुख गोलंदाजांविरोधात विराटचं प्रदर्शन - 
 हैदराबादचा अनुभवी वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमार लयीत दिसत आहे. आतापर्यंत झालेल्या सहा सामन्यात भुवनेश्वर कुमारने आठ विकेट घेतल्यात आहे.  कोहली आणि भुवनेश्वर यांची आतापर्यंत टक्कर रंगतदार झाली आहे. कोहलीने भुवनेश्वर कुमारच्या 62 चेंडूत 75 धावा चोपल्या आहेत. तर भुवनेश्वर कुमारने तीन वेळा विराट कोहलीला बाद केलेय.  


यंदाच्या हंगामात हैदराबादसाठी 12 विकेट घेणाऱ्या नटराजन आणि विराट कोहली यांच्यातील सामना पाहाण्यासारखा असेल. विराट कोहलीला नटरजानविरोधात प्रभावी कामगिरी करता आलेली नाही. नटराजनच्या 13 चेंडूत विराटला फक्त 14 धावा चोपता आल्यात.  नटराजन याने एकदा विराटला तंबूचा रास्ताही दाखवलाय.  


150 किलोमीटर प्रति तास वेगानं चेंडू फेकणाऱ्या उमरान मलिक आणि विराट कोहलीचा आतापर्यंत सामना झालेला नाही. जर आज हे दोघे आज समोरासमोर आले तर यांचा सामना पाहण्यासारखा असेल.  


हे देखील वाचा-