DD VS RR: आयपीएल 2022 च्या 34 व्या सामन्यात राजस्थान रॉयल्सनं दिल्ली कॅपिटल्सला (Delhi Capitals Vs Rajasthan Royals) धुळ चाखली. राजस्थाननं दिलेल्या 223 धावांचा पाठलाग करणाऱ्या दिल्लीच्या संघाला 20 षटकात 209 धावांपर्यंत मजल मारता आली. ज्यामुळं राजस्थाननं 15 धावांनी विजय मिळवला. दिल्लीला पराभूत करत राजस्थानच्या संघानं या हंगामातील पाचवा विजय मिळवला आहे. या विजयासह राजस्थानच्या संघानं आयपीएलच्या गुणतालिकेत अव्वल स्थानी झेप घेतली आहे. राजस्थानच्या विजयात प्रसिद्ध कृष्णानं (Prasidh Krishna) महत्वाची भूमिका बजावली.


प्रसिद्ध कृष्णाची 19 व्या षटकात उत्कृष्ट कामगिरी
दरम्यान, राजस्थानविरुद्ध अखेरच्या दोन षटकात दिल्लीच्या संघाला 36 धावांची आवश्यकता होती. त्यावेळी राजस्थानचा कर्णधार संजू सॅमसननं प्रसिद्ध कृष्णाकडं चेंडू सोपवला. संजू सॅमसनच्या विश्वासावर प्रसिद्ध कृष्णा खरा उतरला. त्यानं 19 वं षटक निर्धाव टाकलं. ज्यामुळं दिल्लीला अखेरच्या षटकात 36 धावा करण्याचं मोठं आव्हान उभं राहिलं. या सामन्यात प्रसिद्ध कृष्णानं चार षटक टाकून तीन विकेट्स घेतल्या. ज्यात डेव्हिड वार्नर, ऋषभ पंत आणि ललित यादव यांचा समावेश आहे. 



आयपीएलच्या मेगा ऑक्शनमध्ये प्रसिद्ध कृष्णाची 10 कोटीत विक्री
आयपीएलच्या मेगा ऑक्शनमध्ये राजस्थान रॉयल्सनं प्रसिद्ध कृष्णाला 10 कोटीत खरेदी केलं होतं. त्याची मूळ किंमत एक कोटी होती. आयपीएलच्या मागच्या हंगामात प्रसिद्ध कृष्णा कोलकाता नाईट रायडर्सकडून खेळला होता. कोलकात्याकडून खेळताना प्रसिद्ध कृष्णा उत्कृष्ट गोलंदाजीच्या जोरावर सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. 


राजस्थानचा 15 धावांनी विजय
या सामन्यात नाणेफेक जिंकून दिल्लीच्या संघानं प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर फलंदाजी करण्यासाठी मैदानात आलेल्या राजस्थानच्या संघानं 20 षटकात दोन विकेट्स गमावून दिल्लीसमोर 223 धावांचं लक्ष्य ठेवलं. राजस्थानकडून जोस बटलरनं (116) आणि देवदत्त पडिक्कलनं (54) तुफानी फलंदाजी फलंदाजी केली. तर, संजू सॅमसननं 46 धावांची नाबाद खेळी केली. प्रत्युत्तरात दिल्लीच्या संघानं 20 षटकात आठ विकेट्स गमावून 207 धावा केल्या. दिल्लीकडून कर्णधार ऋषभ पंतनं सर्वाधिक 44 धावांची खेळी केली. 


हे देखील वाचा-