No Ball Controversy: मुंबईच्या वानखेडे मैदानावर खेळण्यात आलेल्या आयपीएलच्या 34 व्या सामन्यात राजस्थान रॉयल्सनं दिल्लीच्या कॅपिटल्सचा 15 धावांनी पराभव केला आहे.  या सामन्यात राजस्थानच्या संघानं दिल्लीचा 15 धावांनी पराभव केला. या हाय व्होल्टेज सामन्यात पंचांनी दिलेल्या निर्णयामुळं नव्या वादाला तोंड फुटलं.पंचांनी नो बॉल न दिल्यानं दिल्लीचा कर्णधार ऋषभ पंत संतापल्याचं पाहायला मिळालं. पंचांनी दिलेल्या निर्णयानवर नाराजी व्यक्त करत ऋषभ पंतनं क्रिजवरील फलंदाजाला माघारी येण्याचा इशारा केला. ऋषभ पंतच्या कृत्यामुळं नेटकऱ्यांना चेन्नई सुपर किंग्जचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीची आठवण आली. 


दरम्यान, आयपीएल 2020 मध्ये राजस्थानविरुद्ध सामन्यात धोनीनं पंचांच्या निर्णयावर नाराजी व्यक्त केली होती. त्यावेळीही नो-बॉल वरून धोनीनं पंचाशी वाद घातला होता. दरम्यान, राजस्थान विरुद्ध पार पडलेल्या सामन्यात ऋषभ पंतनंही धोनीच्या कृत्याची पुनरावृत्ती केली. ज्यामुळं सोशल मीडियावर धोनी आणि ऋषभ पंतला ट्रोल केलं जात आहे. गुरू आणि शिष्य दोन्ही सारखेच असल्याची चर्चा सोशल मीडियावर सुरू आहे.






नेमकं काय घडलं?
या सामन्यातील अखेरच्या षटकात दिल्लीच्या संघाला विजयासाठी 6 चेंडूत 36 धावा करायच्या होत्या. दरम्यान, मैदतान उपस्थित असलेल्या दिल्लीचा तडाखेबाज फलंदाजरोव्हमन पॉवेलनं पहिल्या तीन चेंडूंवर सलग तीन षटकार मारून दिल्लीच्या आशा उंचावल्या. महत्वाचं म्हणजे, ओबेड मॅकॉयनं टाकलेला तिसरा चेंडू फूल टॉस होता. या चेंडूला दिल्लीच्या संघानं नो-बॉल देण्याची मागणी केली. मात्र, मैदानावरील पंचांनी नो-बॉल दिला नाही. पंचांच्या निर्णयावर कर्णधार ऋषभ पंतनं नाराजी व्यक्त केली. तसेच दिल्लीच्या फलंदाजाला मैदानाबाहेर येण्याचा इशारा केला. त्याचवेळी शार्दुल ठाकूरही आपल्या कर्णधाराला पाठिंबा देत पंचांच्या निर्णयावर नाराजी व्यक्त करताना दिसला.तसेच कर्णधाराच्या सांगण्यावरून प्रवीण आम्रेंनी  मैदानात जाऊन अंपायरशी वाद घातला.



हे देखील वाचा-