RCB vs RR, Match Live Updates :   राजस्थानचा आरसीबीवर 29 धावांनी विजय

आयपीएलमध्ये (IPL 2022) आज रॉयल चॅलेजर्स बंगळुरु आणि राजस्थान रॉयल्स (RCB vs RR) हे दोन्ही संघ आमने-सामने येणार असून दोन्ही पुण्याच्या एमसीए मैदानात सामना पार पडत आहे.

abp majha web team Last Updated: 26 Apr 2022 11:15 PM
 RCB vs RR, Match Live Updates :   राजस्थानचा आरसीबीवर 29 धावांनी विजय

 RCB vs RR, Match Live Updates :  


रियान परागचे विस्फोटक अर्धशतक, कुलदीप सेन आणि अश्विनच्या भेदक माऱ्याच्या जोरावर राजस्थान रॉयल्सने आरसीबीचा 29  धावांनी पराभव केला. 

RCB vs RR, Match Live Updates : आरसीबीला नववा धक्का, सिराज बाद

 RCB vs RR, Match Live Updates : 


सिराजच्या रुपाने आरसीबीला नववा धक्का बसला. सिराज पाच धावा काढून तंबूत परतला

RCB vs RR, Match Live Updates : आरसीबीला आठवा धक्का, हसरंगा बाद

 RCB vs RR, Match Live Updates :  


कुलदीप सेनने हसरंगाला बाद करत राजस्थानला आठवा धक्का दिला. आरसीबी आठ बाद 102 धावा... 

RCB vs RR, Match Live Updates : आरसीबीच्या अडचणी वाढल्या, शाहबाज अहमद बाद

 RCB vs RR, Match Live Updates : 


शाहबाज अहमदला बाद करत अश्विनने राजस्थानला सातवे यश मिळवून दिले. शाबाज 17 धावा काढून माघारी परतला. 

RCB vs RR, Match Live Updates : आरसीबीला मोठा धक्का, फिनिशर दिनेश कार्तिक बाद

 RCB vs RR, Match Live Updates :  


दिनेश कार्तिकच्या रुपाने आरसीबीला मोठा धक्का बसला आहे. यजुवेंद्र चाहलने कार्तिकला धावबाद केले. आरसीबी पाच बाद 75 धावा.. कार्तिक सहा धावा काढून बाद

RCB vs RR, Match Live Updates : आरसीबीचा अर्धा संघ तंबूत, प्रभुदेसाई बाद

RCB vs RR, Match Live Updates : 


आर. अश्विन याने सुयेश प्रभुदेसाईला बाद करत राजस्थानला पाचवे यश मिळवून दिलेय. प्रभुदेसाई सात चेंडूत दोन धावा काढून बाद झाला. 

RCB vs RR, Match Live Updates : आरसीबीला चौथा धक्का, रजत पाटीदार बाद

 RCB vs RR, Match Live Updates : रजत पाटीदारच्या रुपाने आरसीबीला चौथा धक्का बसला आहे. दहा षटकानंतर आरसीबी चार बाद 60 धावा

RCB vs RR : आरसीबीची अवस्था बिकट, तीन गडी बाद

ग्लेन मॅक्सवेल शून्य धावांवर बाद झाला आहे. कुलदीप सेनने त्याला बाद केलं आहे.

RCB vs RR : फाफही बाद, आरसीबीला दुसरा झटका

आरसीबीचा कर्णधार फाफ डु प्लेसीस तंबूत परतला आहे. कुलदीप सेनने त्याला बाद केलं आहे.

RCB vs RR : विराट आजही फेल

अवघ्या 9 धावा करुन विराट कोहली आजही तंबूत परतला आहे. प्रसिधने त्याला बाद केलं आहे.

RCB vs RR : राजस्थानचं आरसीबीसमोर 145 धावांचं आव्हान

राजस्थान रॉयल्स संघानं बंगळुरुसमोर 145 धावांचं आव्हान ठेवलं आहे. रियान परागच्या अर्धशतकामुळे हे शक्य झालं आहे.

रियान परागने षटकार मारत केले अर्धशतक

रियान परागने हर्षल पटेलला षटकार मारत अर्धशतक पूर्ण केले. परागने मोक्याच्या क्षणी अर्धशतकी खेळी केली. 

RCB vs RR : राजस्थानला आठवा झटका

राजस्थानचा प्रसिध कृष्णा धावचीत झाला आहे. त्यामुळे राजस्थानचे आठ गडी तंबूत परतले आहेत.

RCB vs RR : वानिंदूला आणखी एक यश, हीटमायर बाद

वानिंदू हसरंगा याने आज आणखी एक महत्त्वाची विकेट घेतली आहे. त्याने शिमॉरन तंबूत परतला आहे.

RCB vs RR : राजस्थानच्या 100 धावा पूर्ण

राजस्थान रॉयल्सने अखेर 100 धावांचा टप्पा पार केला आहे. सध्या क्रिजवर शिमरॉन आणि रियान पराग हे दोघे आहेत.

RCB vs RR : राजस्थानचा निम्मा संघ तंबूत परत

23 चेंडूत 16 धावा करुन डॅरील मिचेल तंबूत परतला आहे. हेझलवुडने त्याला बाद केलं आहे.

RCB vs RR : संजू त्रिफळाचीत, वानिंदूला यश

चांगल्या फॉर्ममध्ये असणारा राजस्थानचा कर्णधार संजू सॅमसन 27 धावा करुन बाद झाला आहे. वानिंदू हसरंगाने त्याला त्रिफळाची केलं आहे.

RCB vs RR, Match Live Updates : राजस्थानला तीन धक्के, बटलरही परतला माघारी

RCB vs RR, Match Live Updates :  नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी कऱणाऱ्या आरसीबीने राजस्थानाच्या तीन फलंदाजांना बाद केले आहे. यंदाच्या आयपीएलमध्ये सर्वाधिक धावा काढणाऱ्या जोस बटलरचाही अडथळा केला दूर.. राजस्थान तीन  बाद 33

RCB vs RR, Match Live Updates : आरसीबी-राजस्थान सामन्याला सुरुवात

RCB vs RR, Match Live Updates : नाणेफेक गमावल्यानंतर राजस्थानचे सलामी पलंदाज जोस बटलर आणि देवदत्त पडिकल मैदानात उतरले आहेत. प्रथम फलंदाजी करतााना मोठी धावसंख्या उभारण्याचा राजस्थानाच प्रयत्न असेल. 

RCB vs RR : बंगळुरुने नाणेफेक जिंकत निवडली गोलंदाजी

नुकतीच नाणेफेक झाली असून बंगळुरुने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.

RCB vs RR : राजस्थानचा संभाव्य संघ

जोस बटलर, यशस्वी जैस्वाल, देवदत्त पडिक्कल, संजू सॅमसन (कर्णधार,विकेटकीपर), शिमरॉन हेटमायर, रियान पराग, प्रसिध कृष्णा, रवीचंद्रन अश्विन, कुलदीप सेन, ट्रेंट बोल्ट, युझवेंद्र चहल. 

RCB vs RR : बंगळुरुचा संभाव्य संघ

फाफ डु प्लेसीस (कर्णधार), अनुज रावत, विराट कोहली, ग्लेन मॅक्सवेल, दिनेश कार्तिक (विकेटकीपर), डेविड विली, शाहबाज अहमद, वानिंदू हसरंगा, हर्षल पटेल, आकाश दीप, मोहम्मद सिराज


 

RCB vs RR : आज आयपीएलमध्ये रॉयल लढत

आयपीएलमध्ये (IPL 2022) आज रॉयल चॅलेजर्स बंगळुरु आणि राजस्थान रॉयल्स (RCB vs RR) हे दोन्ही संघ आमने-सामने येणार असून दोन्ही संघाची आतापर्यंतची कामगिरी तशी कमाल आहे, त्यामुळे आजचा सामना चुरशीचा होण्याची दाट शक्यता आहे.

पार्श्वभूमी

RCB vs RR, Live Score : आयपीएलमधील(IPL 2022) आज रॉयल चॅलेजर्स बंगळुरु आणि राजस्थान रॉयल्स (RCB vs RR) या दोन संघात सामना पार पडत आहे. दोन्ही संघाचा यंदाच्या हंगामातील (IPL 2022) फॉर्म दमदार असल्याने त्यांच्यातील आजचा सामनाही चुरशीचा होईल अशी आशा सर्व क्रिकेटरसिकांना आहे.  गुणतालिकेचा विचार करता राजस्थानचा संघ 7 पैकी 5 सामने जिंकत 10 गुणांसह तिसऱ्या स्थानावर आहे. तर दुसरीकडे बंगळुरुचा संघ देखील चांगल्या फॉर्ममध्ये असून त्यांनी 8 पैकी 5 सामने जिंकत 10 गुण खिशात घेऊन पाचवं स्थान मिळवलं आहे. गुजरात नंतर राजस्थानची कामगिरी यंदा अतिशय उल्लेखनीय असून दुसरीकडे बंगळुरुचा संघ काही सामन्यात खराब कामगिरी केलेली वगळता कमाल फॉर्ममध्ये दिसून येत आहे.  पै


आजवर रॉयल चॅलेजर्स बंगळुरु आणि राजस्थान रॉयल्स (RCB vs RR) हे संघ तब्बल 26 वेळा एकमेंकाविरुद्ध मैदानात उतरले आहेत. या सर्व सामन्यांचा विचार करता बंगळुरुचं पारडं काहीसं जड राहिलं आहे. त्यांनी 13 सामन्यात विजय मिळवला आहे. तर राजस्थानने 10 सामने जिंकण्यात यश मिळवलं आहे. याशिवाय तीन सामने अनिर्णीत राहिले आहेत. दरम्यान आजचा सामना होणाऱ्या पुण्यातील एमसीए मैदानात मागील काही सामने न झाल्यामुळे खेळपट्टी आज चांगली असल्याचं दिसून येत आहे. दिल्ली संघात कोरोनाच्या शिरकावामुळे त्यांचे सामने पुण्यातून मुंबईत घेण्यात आले. त्यामुळे काहीशा चांगल्या स्थितीत असणाऱ्या पुण्याच्या मैदानात आज होणारा सामना चुरशीचा होऊ शकतो. यंदाच्या हंगामात बहुतांश संघानी दुसऱ्यांदा फलंदाजी करताना विजय मिळवला आहे. त्यामुळे आजही नाणेफेक जिंकणारा संघ प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेण्याची दाट शक्यता आहे.


बंगळुरुचा संभाव्य संघ: 


 फाफ डु प्लेसीस (कर्णधार), अनुज रावत, विराट कोहली, ग्लेन मॅक्सवेल, दिनेश कार्तिक (विकेटकीपर), डेविड विली, शाहबाज अहमद, वानिंदू हसरंगा, हर्षल पटेल, आकाश दीप, मोहम्मद सिराज


राजस्थानचा संभाव्य संघ: 


जोस बटलर, यशस्वी जैस्वाल, देवदत्त पडिक्कल, संजू सॅमसन (कर्णधार,विकेटकीपर), शिमरॉन हेटमायर, रियान पराग, प्रसिध कृष्णा, रवीचंद्रन अश्विन, कुलदीप सेन, ट्रेंट बोल्ट, युझवेंद्र चहल. 


हे देखील वाचा-


- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2025.ABP Network Private Limited. All rights reserved.