IPL 2022: आयपीएलच्या पंधराव्या हंगामात राजस्थानच्या संघानं (Rajasthan Royals) उत्कृष्ट प्रदर्शन करुन दाखवलंय. आयपीएलच्या गुणतालिकेत राजस्थानचा संघ दुसऱ्या क्रमांकावर आहे. आयपीएलच्या साखळी सामन्यात राजस्थानच्या फलदांज आणि गोलंदाजांनी दमदार कामगिरी केली. दरम्यान, राजस्थानचा संघ गुजरात टायटन्ससोबत 24 मे ला कोलकात्याच्या ईडन गार्डन्सवर आयपीएल 2022 मधील पहिला क्वालीफायर सामना खेळणार आहे. राजस्थानच्या यशात आक्रमक फलंदाज जोस बटल आणि फिरकीपटू युजवेंद्र चहलनं महत्वाची भूमिका बजावली. तर, आयपीएल 2022 मध्ये राजस्थानचं प्रदर्शन कसं होतं? त्यावर एक नजर टाकुयात. 


साखळी सामन्यात राजस्थाननं दाखवला दम
आयपीएलच्या साखळी सामन्यात राजस्थाननं दमदार प्रदर्शन केलं. दरम्यान, राजस्थाननं 14 पैकी 9 सामन्यात विजय मिळवून 18 गुणांसह प्लेऑफमध्ये धडक दिली. या हंगामात राजस्थानला पाच सामन्यात पराभव स्वीकारावा लागला. राजस्थानसाठी जोस बटलरनं आक्रमक फलंदाजी केली. तसेच ऑरेंज कॅपच्या शर्यतीत तो अव्वल स्थानी आहे. याशिवाय, युजवेंद्र चहलनंही चांगल्या कामगिरीच्या जोरावर सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. पर्पल कॅपच्या शर्यतीत तो पहिल्या क्रमांकावर आहे. 


कोणकोणत्या संघाकडून राजस्थानला पराभव स्वीकारावा लागला
या हंगामातील राजस्थानच्या संघाला पाच सामन्यात पराभव पत्कारावा लागला. दरम्यान, राजस्थानचा मुंबईविरुद्ध खेळण्यात आलेल्या आयपीएल 2022 च्या 44 व्या सामन्यात पराभव झाला होता. याशिवाय, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (13 वा सामना), गुजरात टायटन्स (24 वा सामना) आणि दिल्लीकडून (58 वा सामना) राजस्थानला पराभव स्वीकारावा लागला होता.


राजस्थानचा संघ यंदाच्या विजयाचा प्रबळ दावेदार
आयपीएलच्या यंदाच्या हंगामात प्लेऑफच्या चार संघ ठरले आहेत. गुजरात, राजस्थान, लखनौ आणि आरसीबीनं प्लेऑफमध्ये प्रवेश केलाय. यामध्ये राजस्थान एकमेव संघ आहे, ज्यानं आयपीएल चषक उंचावलाय. तर लखनौ आणि गुजरात पहिल्यांदाच आयपीएलमध्ये खेळत आहेत. तर, आरसीबीला आतपार्यंत एकदाही विजेतेपद मिळालेलं नाही. राजस्थानला यंदाच्या आयपीएल विजेतेपदाचा प्रबळ दावेदार मानलं जात आहे. 


हे देखील वाचा-