IPL 2022: आयपीएलच्या पंधराव्या हंगामातील सर्व साखळी सामने संपले आहेत. प्लेऑमध्ये गुजरात टायटन्स, राजस्थान रॉयल्स, लखनौ सुपर जायंट्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूनं स्थान मिळवलं आहे. या चार संघापैकी एक जण आयपीएल 2022 च्या ट्रॉफीवर नाव कोरेल. आयपीएलमधील प्लेऑफ सामने कोलकाता आणि अहमदाबादच्या मैदानावर खेळवले जातील. क्वालिफायर 1 आणि एलिमिनेटर सामना कोलकाताच्या इडन गार्डन्सवर होणार आहे. यासाठी आरसीबीचा संघ कोलकात्याला रवाना झाला आहे. आरसीबीनं आपल्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवर फोटो शेअर करून याबाबत माहिती दिली.

आरसीबीनं आपल्या ट्विटर अकाऊंटवर अनेक खेळाडूंचे फोटो शेअर करत कोलकात्याला निघालो आहोत, असं लिहलं आहे. या फोटो मध्ये आरसीबीचा माजी कर्णधार विराट कोहली, कर्णधार फाफ डू प्लेसीस, ग्लेन मॅक्सवेल, हर्षल पटेल आणि मोहम्मद सिराज इत्यादी दिसत आहेत. आयपीएल 2022 मध्ये  आरसीबीनं 14 पैकी आठ सामने जिंकले आहेत. 16 गुणांसह संघ गुणतालिकेत चौथ्या स्थानावर आहे. एलिमिनेटरमध्ये आरसीबीचा सामना लखनऊ सुपर जायंट्सशी होणार आहे. या सामन्यात जिथे विजेता संघ क्वालिफायर 2 मध्ये प्रवेश करेल. तसेच पराभूत झालेल्या संघाचा प्रवास इथेच संपेल.

ट्वीट-

आयपीएल 2022 मधील लखनौचा प्रवास
पहिल्यांदाच आयपीएलमध्ये प्रेवश केलेल्या लखनौ सुपर जायंट्सनं चमकदार कामगिरी करून दाखवली आहे. केएल राहुलच्या नेतृत्वात लखनौनं 14 पैकी नऊ सामन्यात विजय मिळवला आहे. 18 गुणासह लखनौचा संघ आयपीएलच्या गुणतालिकेत तिसऱ्या क्रमांकावर आहे.  केएल राहुल आणि सलामीवीर क्विंटन डी कॉक सध्या उत्कृष्ट फॉर्ममध्ये आहेत. कोलकाताविरुद्धच्या गेल्या सामन्यात दोघांनी ऐतिहासिक भागीदारी केली होती. दोघांमध्ये पहिल्या विकेटसाठी 210 धावांची भागीदारी झाली. या सामन्यात क्विंटन डी कॉकनं 70 चेंडूत 140 धावा ठोकल्या होत्या. 

आयपीएल 2022 प्लेऑफच्या सामन्यांचं वेळापत्रक-

सामना  संघ  तारीख ठिकाण
क्वालीफायर-1 गुजरात टाइटंस विरुद्ध राजस्थान रॉयल्स 24 मे 2022 कोलकता
एलिमिनेटर लखनऊ सुपर जायंट्स विरुद्ध रॉयल चैलेंजर्स बैंगलोर 24 मे 2022 कोलकाता
क्वालीफायर-2 एलिमिनेटरचा विजेता आणि पहिल्या क्वालिफायरमध्ये पराभूत झालेला संघ 27 मे 2022 अहमदाबाद
फायनल क्वालिफायर-1 आणि क्वालिफायर-2 मधील विजेता संघ 29 मे 2022 अहमदाबाद

हे देखील वाचा-