IPL 2022: आयपीएलचा पंधराव्या हंगामात पंजाब किंग्जला (Punjab Kings) काही खास कामगिरी करता आली नाही. या हंगामात पंजाबच्या संघानं 14 पैकी सात सामन्यात विजय मिळवला आहे. तर, सात सामन्यात पराभव स्वीकारला आहे. दरम्यान, आयपीएल 2022 मधील अखेरचा साखळी सामना सनरायजर्स हैदराबाद आणि पंजाब किंग्ज यांच्यात खेळला गेला. या सामन्यात पंजाबचा सलामीवीर शिखर धवननं (Shikhar Dhawan) नव्या विक्रमाला गवसणी घातली आहे. आयपीएलमध्ये सर्वाधिक चौकार मारण्याचा विक्रम शिखर धवनच्या नावावर नोंदवण्यात आला आहे. याबाबतीत त्यानं विराट कोहली (Virat Kohli), डेव्हिड वार्नर (David Warner), रोहित शर्माला (Rohit Sharma) आणि सुरेश रैनाला (Suresh Raina) मागं टाकलं आहे. 

दरम्यान, हैदराबादविरुद्ध सामन्यात शिखर धवननं 39 धावांची खेळी केली. ज्यात त्यानं दोन चौकार आणि दोन षटकारांचा समावेश होता. या सामन्यापूर्वी शिखर धवनच्या नावावर 699 चौकारांची नोंद होती. आयपीएलमध्ये शिखर धवननं 206 सामने खेळले आहेत. ज्यात त्यानं 701 चौकार आणि 136 षटकार मारले आहेत. आयपीएलमध्ये शिखर धवननं सहा हजार धावांचाही टप्पा गाठला आहे. अशी कामगिरी करणारा शिखर दुसरा क्रमांकावर आहे. या यादीत विराट कोहली 6 हजार 592 धावांसह पहिल्या क्रमांकावर आहे. 

आयपीएलमध्ये सर्वाधिक चौकार मारणारे फलंदाज

क्रमांक फलंदाजांचं नाव  एकूण चौकार
1 शिखर धवन 701
2 विराट कोहली  576
3 डेव्हिड वार्नर 561
4 रोहित शर्मा 519
5 सुरेश रैना 506

 

दक्षिण आफ्रिकाविरुद्ध टी-20 मालिकेत शिखरला संघात स्थान नाही
आयपीएलनंतर दक्षिण आफ्रिकेचा संघ भारत दौरा करणार आहे. या दौऱ्यात दक्षिण आफ्रिकेचा संघ भारताशी पाच सामन्यांची टी-20 मालिका खेळणार आहे. या मालिकेत अनेक युवा फलंदाजाला संधी देण्यात आली आहे. परंतु, या मालिकेतून शिखर धवनला वगळण्यात आलं आहे. इंग्लंड दौऱ्यातही शिखर धवनचं नाव नाही. आयपीएलमध्ये शिखर धवननं 14 सामन्यात 38.33 च्या सरासरीनं 460 धावा केल्या आहेत.

हे देखील वाचा-