Umran Malik: आयपीएलच्या पंधराव्या हंगामात अनेक युवा खेळाडूंनी दमदार कामगिरी करून सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. या यादीत सनरायजर्स हैदराबादचा वेगवान गोलंदाज उमरान मलिक यांच्याही नावाचा समावेश आहे. यंदाच्या हंगामात उमरान मलिकनं आपल्या वेगानं सर्वांना आश्चर्यचकीत केलंय. हैदराबादकडून त्यानं एकूण 14 सामने खेळले आहेत. ज्यात 21 विकेट्स घेतले आहेत. या हंगामात त्यानं सातत्यानं 150 किमी प्रतितासानं गोलंदाजी केली आहे. त्याची कामगिरी पाहून भारतीय निवड समतीनं दक्षिण आफ्रिकाविरुद्ध टी-20 मालिकेत त्याला संधी दिली आहे. ज्यानंतर उमरानचे वडील भावूक झाले आहेत. भारतीय संघात स्थान मिळवण्यासाठी त्यानं खूप मेहनत घेतली आहे, असंही उमरानच्या वडिलांनी म्हटलं आहे. 

दरम्यान, 22 वर्षीय उमरानचा टीम इंडियाचा प्रवास सोपा नव्हता. उमरानचे वडील अब्दुल मलिक हे स्थानिक फळ आणि भाजीपाल्याचं दुकान चालवतात. उमराननं चार वर्षांपूर्वी गुजर नगर येथील काँक्रीटच्या खेळपट्टीवर कारकिर्दीला सुरुवात केली.उमरानचे वडील अब्दुल मलिक एका मुलाखतीत म्हणाले होते की, "उमरान मलिक 22 वर्षाचा आहे. हे वय कसं असतं? हे आम्हाला माहीत आहे. या वयात अनेक तरूण अमली पदार्थांचे सेवन करून आयुष्य उद्ध्वस्त करत आहेत. पण उमरानला केवळ क्रिकेटची नशा होती. तो खरंच खेळतोय की नाही हे पाहण्यासाठी कधी कधी डोकावून पाहायचो. आज त्याची भारतीय संघात निवड झाली आहे. हे सर्व त्याच्या मेहनतीमुळं घडलं आहे."

भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका सामन्यांचे वेळापत्रक

सामना दिनांक  ठिकाण
पहिला टी-20 सामना 9 जून 2022 अरुण जेटली स्टेडियम, दिल्ली
दुसरा टी-20 सामना 12 जून 2022 बाराबती स्टेडियम, कट्टक
तिसरा टी-20 सामना 14 जून 2022 डॉ वाय.एस. राजशेखर रेड्डी एसीए-व्हीडीसीए क्रिकेट स्टेडियम,विशाखापट्टणम
चौथा टी-20 सामना 17 जून 2022 सौराष्ट्र क्रिकेट असोसीएशन स्टेडियम, राजकोट
पाचवा टी-20 सामना 19 जून 2022 एम. चिन्नस्वामी स्टेडियम बंगळुरु

दक्षिण आफ्रिकेविरुद्ध भारतीय संघ-
केएल राहुल (कर्णधार), ऋतुराज गायकवाड, ईशान किशन, दीपक हुडा, श्रेयस अय्यर, ऋषभ पंत (विकेटकीपर), दिनेश कार्तिक, हार्दिक पंड्या, वेंकटेश अय्यर, युझवेंद्र चहल, कुलदीप यादव, अक्षर पटेल, रवी बिश्नोई, भुवनेश्वर कुमार, हर्षल पटेल, आवेश खान, अर्शदीप सिंह, उम्रान मलिक.

हे देखील वाचा-