Team India T20 Sqaud : दक्षिण आफ्रिकेविरुद्ध सुरु होणाऱ्या टी20 सामन्यांच्या मालिकेसाठी बीसीसीआयने (BCCI) नुकतीच संघाची घोषणा केली आहे. यावेळी आयपीएलमधील दमदार कामगिरीच्या जोरावर काही खेळाडूंची संघात एन्ट्री झाली असून यातील एक नाव म्हणजे पंजाब किंग्सचा युवा गोलंदाज अर्शदीप सिंह (Arshdeep Singh). दरम्यान अर्शदीपच्या संघात येण्याने माजी भारतीय क्रिकेटपटू वीरेंद्र सेहवागला आनंदी झाला असून त्याने या युवा गोलंदाजाची तुलना जहीर-नेहरा या दिग्गजांसोबत केली आहे. अर्शदीपने यंदाच्या हंगामात 14 सामन्यात 10 विकेट्स नावे केल्या आहेत. विशेष म्हणजे अर्शदीपने डेथ ओव्हरमध्ये अधिक दमदार गोलंदाजी केली.   


भारतीय निवडकर्त्यांनी दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यांसाठी निवडलेल्या संघाची घोषणा बीसीसीआयने रविवारी ट्वीटरवरुन केली. यावेळी 18 सदस्यीय संघामध्ये काही नव्या खेळाडूंची एन्ट्री झाली असून हार्दिक पंड्या दिनेश कार्तिक या दिग्गजांचे पुनरागमन झाले. कार्तिकला तर 3 वर्षानंतर पुन्हा संघात संधी मिळाली. या सर्वाबाबत सेहवागने प्रतिक्रिया देताना अर्शदीपच्या निवडीवर आनंद दर्शवला.


जहीर-नेहरासोबत तुलना


सेहवागने आयपीएल 2022 मध्ये पंजाब किंग्सकडून शानदार प्रदर्शन केलं. त्याने 14 सामन्यात 10 विकेट्स घेतल्या. डेथ ओव्हरमध्ये अर्शदीपने बरेच रन वाचवले. त्याने 37 धावा देत 3 विकेट्स घेतल्या दरम्यान अर्शदीप सिंगच्या या कामगिरीमुळे सेहवागने अर्शदीपची तुलना भारताचे माजी दिग्गज गोलंदाज जहीर खान आणि आशिष नेहरा यांच्यासोबत केली आहे. 'जहीर-नेहरा खेळत असताना त्यांचीही कामगिरी अशीच असायची,' असं सेहवाग म्हणाला.   


यंदा पंजाबने केलं रिटेन


आयपीएल 2022 (IPL 2022) स्पर्धेच्या महालिलावापूर्वीच पंजाब किंग्सने अर्शदीप सिंहला तब्बल 4 कोटी रुपये देत रिटेन केलं होतं. पंजाबने केवळ दोन खेळाडूंना यंदा रिटेन केलं. यामध्ये कर्णधार मयांक अगरवालसाठी 12 कोटी तर अर्शदीपसाठी 4 कोटी रुपये संघाने मोजले. अर्शदीप रिटेन करण्यात आलेल्या अनकॅप्ड खेळाडूंपैकी एक होता. त्याने 2021 च्या हंगामात 12 सामन्यात 19 च्या सरासरीने आणि 8.27 च्या इकॉनॉमी रेटने 18 विकेट्स घेतल्या होत्या.


हे देखील वाचा-