GT vs RR IPL 2022 : जोस बटलरच्या 89 धावांच्या बळावर राजस्थान संघाने निर्धारित 20 षटकांत सहा गड्यांच्या मोबदल्यात 188 धावा केल्या. थेट फायनलचं तिकीट मिळवण्यासाठी गुजरातच्या संघाला 20 षटकांत 189 धावांचे आव्हान आहे. जोस बटलरशिवाय संजू सॅमसन आणि देवदत्त पडिक्कल यांनी प्रभावी छोटेखानी खेळी केली. 


गुजरातचा कर्णधार हार्दिक पांड्याने नाणेफेक जिंकून राजस्थान संघाला फलंदाजीसाठी आमंत्रित केले. गुजरातच्या गोलंदाजांनी सुरुवातीपासूनच भेदक मारा केला. यश दयालने तीन धावांवर यशस्वी जायस्वालला माघारी धाडले... त्यानंतर कर्णधार संजू सॅमसनने फटकेबाजी सुरु केली.. जोस बटलर संथ फलंदाजी करत होता... संजू सॅमससने 26 चेंडूत 47 धावांची खेळी केली. संजू आणि बटलर यांनी राज्थानचा डाव सावरला. दोघांनी 47 चेंडूत 68 धावांची भागिदारी केली. संजूने तीन षटकार आणि पाच चौकारांसह 47 धावांची खेळी केली. देवदत्त पडिक्कलने 20 चेंडूत 28 धावांची खेळी केली.  पडिकल आणि बटलर यांच्यात 26 चेंडूत 37 धावांची भागिदारी झाली... त्यानंतर अखेरच्या षटकात बटलरने हेटमायरच्या मदतीने चौथ्या विकेटसाठी 26 चेंडूत 45 धावांची भागिदारी केली.  हेटमायर चार धावा काढून बाद झाला.. जोस बटलर 89 धावा काढून धावबाद झाला..रियान पराग चार धावा काढून धावबाद झाला..


बटलरची अर्धशतकी खेळी - 
यंदाच्या हंगामात तुफान फॉर्ममध्ये असणाऱ्या जोस बटलरने सुरुवातीला संयमी फलंदाजी केली.. गुजरातच्या भेदक माऱ्यापुढे बटलरची बॅट शांत होती. बटलरने 42 चेंडूत अर्धशतक पूर्ण केले. जोस बटलर 31 चेंडूत 30 धावांवर खेळत होता.. त्यानंतर अखेरच्या षटकात बटलरने फटकेबाजी करण्यास सुरुवात केली. बटलरने अर्धशतक करेपर्यंत एकही षटकार लगावला नाही... अखेरच्या तीन षटकांमध्ये जोस बटलरने धावांचा पाऊस पाडला.. चौकार आणि षटकारांनी खोऱ्याने धावा वसूल केल्या... जोस बटलरला गुजरातच्या खेळाडूंनी जिवदान दिले..त्याचा फायदा बटलरने उचलला.. जोस बटलरने 56 चेंडूत 89 धावांची खेळी केली. या खेळीदरम्यान बटलरने 12 चौकार आणि दोन षटकार लगावले. 


गुजरातच्या गोलंदाजांनी लय गमावली - 
गुजरातच्या गोलंदाजांनी सुरुवातीला भेदक मारा केला.. पण नंतर राजस्थानच्या फलंदाजांनी धावांचा पाऊस पाडला. गुजरातकडून हार्दिक पांड्या, मोहम्मद शामी, यश दयाल आणि आर साईकिशोर यांनी प्रत्येकी एक एक विकेट घेतली. मोहम्मद शामी, यश दयाल, अल्झारी जोसेफआणि आर साईकिशोर महागडे ठरले.. या गोलंदाजांना प्रतिषटक 10 पेक्षा जास्त धावा चोपल्या आहेत. 


राशिदचा भेदक मारा - 
राशिद खानने भेदक मारा करत राजस्थानच्या फलंदाजांना धावा काढू दिल्या नाहीत. राशिद खानला आजच्या सामन्यात एकही विकेट मिळाली नाही.. पण राजस्थानच्या फलंदाजांना धावाही काढता आल्या नाहीत. राशिद खानने चार षटकात 15 धावा दिल्या.. 


पावसामुळे खेळपट्टी संथ - 
मागील दोन दिवसांपासून कोलकात्यामध्ये पाऊस पडत आहे. त्यामुळे नाणेफेकीचा कौल महत्वाचा होता.. पावसामुळे खेळपट्टी संथ झाली होती..त्यामुळे बॅटवर चेंडू व्यवस्थित येत नव्हता.. त्यामुळे जोस बटलरसारखा विस्फोटक फलंदाजही संथ फलंदाजी करत होता.


संजू सॅमसनने पुन्हा नाणेफेक गमावली -
संजू सॅमसनने आज पुन्हा एकदा नाणेफेक गमावली आहे. यंदाच्या हंगामात सर्वाधिकवेळा नाणेफेक गमावण्याचा नकोसा विक्रम संजूच्या नावावर जमा झालाय. राजस्थान आणि गुजरात यांच्यामध्ये कोलकात्याच्या ईडन गार्डन्स मैदानावर सामना रंगणार आहे. मोक्याच्या सामन्यात गुजरात टायटन्सने मोठा बदल केला आहे. गुजरातने अनुभवी लॉकी फर्गुसनला आराम दिला आहे. त्याच्याजागी अल्झारी जोसेफला संधी दिली आहे.


राजस्थानची (Rajasthan Royals) प्लेईंग 11 - 
जोस बटलर, यशस्वी जायस्वाल, संजू सॅमसन (विकेटकिपर, कर्णदार), देवदत्त पडिक्कल, शिमरोन हेटमायर, रियान पराग, आर अश्विन, ट्रेंट बोल्ट, ओबेड मेकॉय, यजुवेंद्र चाहल, प्रसिद्ध कृष्णा


गुजरातची (Gujarat Titans) प्लेईंग 11 -
शुभमन गिल, वृद्धीमान साहा(विकेटकिपर), मॅथ्यू वेड, हार्दिक पांड्या (कर्णधार), डेविड मिलर, राहुल तेवातिया, राशिद खान, आर. साईकिशोर, मोहम्मद शामी, अल्झारी जोसेफ, यश दयाल