WT20 Challenge 2022: शेफाली वर्मा (Shafali Verma) आणि लॉरा वोल्वार्डच्या (Laura Wolvaardt) वादळी अर्धशतकाच्या जोरावर व्हेलोसिटीनं (Velocity) सुपरनोव्हासला (Supernovas) सात विकेट्सनं पराभूत केलं आहे. या सामन्यात नाणेफेक जिंकून व्हेलोसिटीच्या संघानं प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर प्रथम फलदाजी करण्यासाठी मैदानात आलेल्या सुपरनोव्हासच्या संघानं 20 षटकात पाच विकेट्स गमावून व्हेलोसिटीसमोर 151 धावांचं लक्ष्य ठेवलं होतं. सुपरनोव्हासकडून कर्णधार हरमनप्रीत कौरनं (Harmanpreet Kaur) सर्वाधिक 71 धावांची खेळी केली. 



व्हेलोसिटीनं दिलेल्या लक्ष्याचा पाठलाग करताना व्हेलोसिटीला नत्थकन चांटम रुपात पहिला धक्का लागला. परंतु, शेफाली वर्मानं आक्रमक फलंदाजी सुरुच ठेवली. तिनं या सामन्यात 33 चेंडूत 51 धावा केल्या. ज्यात नऊ चौकार आणि एक षटकार आहे. दरम्यान, आठव्या षटकात यस्तिका भाटीयाला बाद झाली. त्यानंतर मैदानात आलेल्या लॉरा वोल्वार्डनं तडाखेबाज फलंदाजी करून व्हेलोसिटीच्या संघाला विजायाच्या उंबरठ्यावर नेऊन सोडलं. लॉरा वोल्वार्डनं 35 चेंडूत 51 धावा केल्या. या सामन्यात व्हेलोसिटीच्या संघानं सात विकेट्स राखून सुपरनोव्हासच्या संघाचा पराभव केला. सुपरनोव्हासकडून डिआंड्रा डॉटिननं सर्वाधिक दोन विकेट्स घेतल्या. तर, पूजा वस्त्राकरला एक विकेट मिळाली.


नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजी करण्यासाठी मैदानात आलेल्या सुपरनोव्हासची सुरुवात खराब झाली. पहिल्या चार षटकाच्या आत प्रिया पुनिया (4 धावा), डिआंड्रा डॉटिन (6 धावा) आणि हरलीन देओल (7 धावा) माघारी परतले. त्यानंतर तानिया भाटिया आणि कर्णधार हरमनप्रीत कौरनं संघाचा डाव सावरला. दोघांत 82 धावांची भागेदारी झाली. परंतु, 14 व्या षटकातील दुसऱ्या चेंडूवर भाटीया बाद झाली. त्यानंतर सून लूस फलंदाजीसाठी आली. तिनं 14 चेंडूत 20 धावा केल्या. सुपरनोव्हासकडून हरमनप्रीत कौरनं सर्वाधिक 71 धावांची खेळी केली. सुपरनोव्हासनं 20 षटकात पाच विकेट्स गमावून व्हेलोसिटीसमोर 151 धावांचं लक्ष्य ठेवलं. व्हेलोसिटीकडून केट क्रॉसनं सर्वाधिक दोन विकेट्स घेतल्या. तर, दीप्ती शर्मा आणि राधा यादव यांना प्रत्येकी एक-एक विकेट्स मिळाली. 


हे देखील वाचा-