Gujarat Titans vs Rajasthan Royals, Qualifier 1: कोलकात्याच्या ईडन गार्डन्स मैदानावर पहिला क्वालिफायर सामना होणार आहे. गुजरात टायटन्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्यामध्ये सामना रंगणार आहे. सायंकाळी साडेसात वाजाता सामन्याला सुरुवात होणार आहे. पण मागील दोन दिवसांपासून कोलकात्यामध्ये पाऊस पडत आहे. त्यामुळे क्रीडा चाहत्यांमध्ये निराशा आहे. क्लालिफायरच्या सामन्यादरम्यान पाऊस आला तर काय होणार? कारण सामन्यासाठी राखीव दिवस ठेवण्यात आला नाही. क्वालिफायर सामना पावासामुळे अथवा इतर कारणामुळे झाला नीह, तर गुजरातचा संघ फायनलमध्ये धडक मारणार आहे.. 


हार्दिक पांड्याच्या नेतृत्वातील गुजरात संघाने पदार्पणाच्या आयपीएल हंगामात दमदार कामगिरी केली. सांघिक खेळाच्या बळावर गुजरातने प्लेऑफमध्ये प्रवेश केला. गुजरातचा संघ गुणतालिकेत अव्वल स्थानावर आहे. साखळी फेरीत गुजरातच्या संघाने 10 विजय मिळवले तर फक्त चार सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला होता.  दुसऱ्या क्रमांकावर राजस्थान रॉयल्स आहे. राजस्थानने 18 गुणांसह गुणतालिकेत दुसरे स्थान काबिज केलेय. जोस बटलरने खोऱ्याने धावा काढल्या आहेत. तर चाहलने सर्वाधिक विकेट घेतल्या आहे. साखळी फेरीत पर्पल कॅप आणि ऑरेंज कॅप राजस्थानच्या खेळाडूकडे आहे... त्यावरुन राजस्थान संघाची कामगिरी कशी झाली असेल याचा अंदाज लावू शकता.. राजस्थान संघाने 14 सामन्यात 9 विजय आणि पाच सामन्यात पराभव स्वीकाराला आहे. गुजरात आणि राजस्थान यांच्यात क्वालिफायर 1 चा सामना होत आहे. जिंकणारा संघ फायनलमध्ये जाणार आहे.  


...तर गुजरातचा संघ फायनलमध्ये पोहचणार
पावसामुळे एकाही चेंडूचा खेळ झाला नाही, तर गुजरातचा संघ थेट फायनलमध्ये प्रवेश करणार आहे. आयपीएलच्या नियमांनुसार, जर प्लेऑफच्या सामना पावसामुळे होऊ शकला नाही, तर गुणतालिकेतील अव्वल संघ फायनलला पोहचणार आहे. गुजरात आणि राजस्थानमध्ये सामना झाला नाही, तर गुजरातचा संघ थेट फायनलमध्ये जाणार आहे. कारण 20 गुणांसह गुजरातचा संघ गुणतालिकेत अव्वल क्रमांकावर आहे. राजस्थानच्या संघाकडे 18 गुण आहेत. महत्वाचं म्हणजे, क्वालिफायर आणि एलिमिनेटर सामन्याशिवाय फायनलच्या सामन्यासाठीही राखीव दिवस नाही...