IPL 2022 Playoffs: भारतीय क्रिकेट नियामक मंडळानं (BCCI) IPL 2022 च्या प्लेऑफ सामन्यांचे वेळापत्रक जाहीर केले आहे. आयपीएलच्या पंधराव्या हंगामातील प्लेऑफचे सामने कोलकाता (Kolkata) येथील ईडन गार्डन्स (Eden Gardens) आणि अहमदाबादच्या (Ahmedabad) नरेंद्र मोदी स्टेडियमवर (Narendra Modi Stadium) खेळवले जाणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे. महत्वाचं म्हणजे, प्रेक्षकांच्या 100 टक्के उपस्थितीत हे प्ले ऑफचे सामने रंगणार आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, प्लेऑफ आणि एलिमिनेटर कोलकात्यात खेळवले जातील. तर, दुसरा प्लेऑफचा सामना आणि अंतिम सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळला जाणार आहे. या सामन्यांमध्ये स्टेडियममध्ये प्रेक्षकांची पूर्ण उपस्थिती असेल.
आयपीएल 2022 प्ले ऑफ आणि अंतिम सामन्याचं वेळापत्रक-
सामना | तारीख | ठिकाण |
प्ले ऑफचा पहिला सामना | 24 मे 2022 | कोलकाता (ईडन गार्डन्स) |
एलिमिनेटर सामना | 26 मे 2022 | कोलकाता (ईडन गार्डन्स) |
प्लेऑफचा दुसरा सामना | 27 मे 2022 | अहमदाबाद (नरेंद्र मोदी स्डेडियम) |
अंतिम सामना | 29 मे 2022 | अहमदाबाद (नरेंद्र मोदी स्डेडियम) |
बीसीसीआयकडून महिला टी-20 चॅलेंजची घोषणा
नुकतीच बीसीसीआयनं महिला टी-20 चॅलेंजची घोषणा केली होती. महिला टी-20 चॅलेंजच्या आयोजनाची संधी उत्तर प्रदेश क्रिकेट असोसिएशनला मिळणार आहे. ट्रेलब्लेजर्स, सुपरनोवाज आणि व्हेलॉसिटीमधील हे सामने लखनऊमध्ये खेळले जाणार आहेत. सध्या सुरू असलेल्या महिला टी-20 ट्रॉफी संपल्यानंतर मे महिन्यात तिन्ही संघाची निवड करण्यात येणार आहे.
हे देखील वाचा-