LSG vs MI : आज आयपीएलमध्ये (IPL 2022) मुंबई इंडियन्सचा (MI) संघ मैदानात उतरणार आहे. मुंबईने सलग सात सामने गमावल्याने जवळपास ते स्पर्धेबाहेर गेले आहेत. पण तरी त्यांच्यासारख्या एका अव्वल दर्जाच्या संघाचा सामना सर्वच क्रिकेट रसिकांसाठी पर्वणी असतो. त्यांच्या समोर आव्हान असणाऱ्या लखनौची यंदाची कामगिरी दमदार आहे. त्यांनी 7 पैकी 4 सामने जिंकत 8 गुणांसह पाचव्या स्थानावर आहे. त्यामुळे त्यांना आज विजयाची अत्यंत गरज असून मुंबईलाही पहिल्या विजयाची अजूनही प्रतिक्षा आहे. त्यामुळे आजचा सामना चुरशीचा होणार हे नक्की.

  


आज होणाऱ्या मुंबई इंडियन्स आणि लखनौ सुपरजायंट्स (MI vs LSG) या सामन्यात दोन्ही संघाकडून दमदार खेळाडूंची फौज मैदानात उतरणार यात शंका नाही. दोन्ही संघाकडून विजयासाठी शर्थीचे प्रयत्न केले जाणार असून आजचा हा सामना कधी आणि कुठे पाहू शकता, याबद्दल आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. 


कधी आहे सामना?


आज 24 एप्रिल रोजी होणारा मुंबई इंडियन्स आणि लखनौ सुपरजायंट्स भारतीय वेळेनुसार सायंकाळी 7 वाजून 30 मिनिटांनी सुरु होईल. 7 वाजता नाणेफेक होईल.  


कुठे आहे सामना?


हा सामना मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर खेळवला जाणार आहे.


कुठे पाहता येणार सामना?


मुंबई इंडियन्स आणि लखनौ सुपरजायंट्स यांच्यातील आजचा सामना स्टार स्पोर्ट नेटवर्कवर पाहता येणार आहे. वेगवेगळ्या भाषेतून सामना पाहता येणार आहे. तसेच हॉटस्टार अॅपवरही सामना पाहता येईल. याशिवाय https://marathi.abplive.com//amp येथेही तुम्हाला आयपीएलचे लाईव्ह कव्हरेज पाहाता येईल. 


हे देखील वाचा-