PBKS vs CSK, Match Highlights : पंजाबकडून चेन्नईला मात, 11 धावांनी मिळवला विजय

आज आयपीएलच्या मैदानात पंजाब आणि चेन्नई या दोन संघात मुंबईच्या वानखेडे मैदानात पार पडत आहे.

abp majha web team Last Updated: 25 Apr 2022 11:27 PM
PBKS vs CSK : चेन्नईचा 11 धावांनी विजय

अंबाती रायडूची झुंज व्यर्थ ठरली असून पंजाबने चेन्नईवर 11 धावांनी विजय मिळवला आहे.

PBKS vs CSK : धोनी आऊट

धोनी सामना जिंकवेल असे वाटत असतानाच तो झेलबाद झाला आहे.

PBKS vs CSK : अखेरच्या 6 चेंडूत चेन्नईला 27 धावांची गरज

अखेरच्या 6 चेंडूत चेन्नईला विजयासाठी 27 धावांची गरज असून क्रिजवर धोनी आणि जाडेजा आहेत.

PBKS vs CSK : रबाडाने घेतली रायडूची विकेट

अंबाती रायडूने एक दमदार अशी खेळी आज केली, पण तो संघाला विजयापर्यंत घेऊन जाऊ शकला नाही. रायडू 78 धावांवर बाद झाला. रबाडाने त्याला बाद केलं आहे.

PBKS vs CSK : अंबातीचे सलग तीन षटकार

चेन्नईला सामना जिंकवून देण्यासाठी अंबाती रायडू शर्थीचे प्रयत्न करत आहेत. नुकतंच 16 व्या षटकात त्याने तीन सलग सिक्स आणि एक फोर मारला.

PBKS vs CSK : रायडूचं दमदार अर्धशतक

अंबाती रायडू याने एक दमदार असं अर्धशतक झळकावलं आहे. त्याने 28 चेंडूत 52 धावा केल्या आहेत.

PBKS vs CSK : ऋतुराजही बाद

चेन्नईचा डाव सावरत आहे, असे वाटतानात ऋतुराज गायकवाड 30 धावांवर बाद झाला आहे. 

PBKS vs CSK : चेन्नईचे 3 गडी तंबूत परत

उथप्पा पाठोपाठ सँटनर आणि शिवम दुबेही तंबूत परतले आहेत. 7 ओव्हरनंतर चेन्नईचा स्कोर 40 वर 3 बाद झाला आहे.

PBKS vs CSK : चेन्नईची खराब सुरुवात, उथप्पा बाद

चेन्नई सुपरकिंग्स संघ 188 धावा करण्यासाठी मैदानात उतरला असताना सुरुवातच खराब झाली आहे. रॉबिन उथप्पा एक धाव करुन बाद झाला आहे.

PBKS vs CSK : पंजाबचा डाव 187 धावांवर आटोपला

शिखर धवनच्या नाबाद 88 धावांच्या जोरावर पंजाबने 187 धावा केल्या असून चेन्नईला आता विजयासाठी 188 धावांची गरज आहे.

PBKS vs CSK : लियाम बाद, ब्राव्होला दुसरं यश

7 चेंडूत 19 धावांची फटकेबाजी करुन लियाम तंबूत परतला. ब्राव्होने त्याची विकेट घेतली आहे.

PBKS vs CSK : भानुकाचं अर्धशतक हुकलं

42 धावा करुन भानुका राजपक्षा बाद झाला आहे. ब्राव्होच्या चेंडूवर शिवमने त्याचा झेल घेतला आहे.

PBKS vs CSK : 15 षटकानंतर पंजाब 123/1

15 षटकं संपली असून शिखर आणि भानुका यांनी पंजाबचा डाव सावरला आहे. 15 षटकानंतर पंजाबची स्थइती 123 वर एक बाद आहे.

PBKS vs CSK : शिखरचं अर्धशतक पूर्ण

पंजाबचा डाव सांभाळलेल्या शिखरने नुकतच अर्धशतक पूर्ण केलं आहे. त्याने 37 चेंडूत अर्धशतक ठोकलं आहे.

PBKS vs CSK : पंजाबच्या 100 धावा पूर्ण

शिखर धवनसोबत भानुकाच्या संयमी खेळीच्या जोरावर पंजाबने 100 धावांचा टप्पा पार केला आहे. 13 षटकानंतर पंजाबचा स्कोर 103 वर एक बाद आहे.

PBKS vs CSK : पंजाबला पहिला धक्का, मयांक अग्रवाल 18 धावांवर बाद

PBKS vs CSK :  मयांक अग्रवाल 18 धावांवर बाद झाला आहे. पंजाबच्या सहा षटकानंतर एक बाद 37 धावा झाल्या आहेत. 

PBKS vs CSK : पंजाब पाच षटकानंतर 29/0

पंजाब संघाने प्रथम फलंदाजी करत सावध सुरुवात केली आहे. त्यांनी 5 षटकानंतर एकही विकेट न गमावता 29 धावा केल्या आहेत.

PBKS vs CSK : नाणेफेक जिंकत चेन्नईचा गोलंदाजीचा निर्णय

सामन्यात नुकतीच नाणेफेक झाली असून चेन्नई सुपरकिंग्सने टॉस जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.

PBKS vs CSK : चेन्नई सुपर किंग्सचा संभाव्य संघ

ऋतुराज गायकवाड, रॉबिन उथप्पा, अंबाती रायुडू, शिवम दुबे, रविंद्र जडेजा (कर्णधार), एमएस धोनी (विकेटकीपर), ड्वेन प्रिटोरियस, ड्वेन ब्रावो, मिचेल सेंटनर, महेश तिक्षणा, मुकेश चौधरी.


 

PBKS vs CSK : पंजाब किंग्सचा संभाव्य संघ

मयांक अग्रवाल (कर्णधार), शिखर धवन, भानुका राजपक्षे, लियाम लिव्हिंगस्टन, जितेश शर्मा (विकेटकिपर), शाहरुख खान, कागिसो रबाडा, नॅथन एलिस, राहुल चहर, वैभव अरोरा, अर्शदीप सिंह.


 

PBKS vs CSK : आजची 'किंग्स' लढत

आयपीएल 2022 च्या 38 व्या सामन्यात पंजाब किंग्ज आणि चेन्नई सुपर किंग्ज आमने सामने येणार आहेत. वानखेडे स्टेडियममध्ये आज सामना रंगणार आहे.

पार्श्वभूमी

PBKS vs CSK, Live Score : आयपीएलमधील(IPL 2022) आज पंजाब किंग्स आणि चेन्नई सुपरकिंग्स (PBKS vs CSK) या दोन संघात सामना पार पडत आहे. यंदाच्या हंगामात (IPL 2022) चेन्नईने 7 पैकी 2 सामने जिंकत स्पर्धेतील आव्हान जिवंत ठेवले आहे. पण ते सध्या नवव्या स्थानावर आहेत. दुसरीकडे पंजाबनेही 7 पैकी 4 सामने गमावल्याने ते आठव्या स्थानावर आहेत. आजचा सामना मुंबईतील वानखेडे मैदानात पार पडणार आहे. आजवरच्या इतिहासाचा विचार आतापर्यंत चेन्नई सुपर किंग्स आणि पंजाब किंग्स यांच्यामध्ये 26 सामने झाले आहेत . या सर्व सामन्यांचा विचार करता चेन्नईचं पारडं जड दिसत असून त्यांनी एकूण 15 सामन्यांत विजय मिळवला आहे. तर दुसरीकडे पंजाब संघाचा विचार करता त्यांनी आतापर्यंत 11 सामने जिंकले आहेत. त्यामुळे आजच्या सामन्यात कोणता संघ सरशी करणार याकडे क्रिकेट चाहत्यांचे लक्ष आहे. 


आजचा सामना मुंबईतील वानखेडे मैदानात पार पडणार आहे. इतर मैदानांपेक्षा काहीसं छोटं मैदान असल्याने षटकार, चौकारांची बरसात याठिकाणी होत असते. त्यामुळे वानखेडे मैदानात मोठी धावसंख्या उभी राहताना दिसते. त्यात आजचा सामना  सायंकाळच्या सुमारास होणार असल्याने दुसऱ्यांदा गोलंदाजी करणाऱ्या संघाला दवाची अडचण येऊ शकते.


पंजाब किंग्सचा संभाव्य संघ: 


मयांक अग्रवाल (कर्णधार), शिखर धवन, भानुका राजपक्षे, लियाम लिव्हिंगस्टन, जितेश शर्मा (विकेटकिपर), शाहरुख खान, कागिसो रबाडा, नॅथन एलिस, राहुल चहर, वैभव अरोरा, अर्शदीप सिंह.


चेन्नई सुपर किंग्सचा संभाव्य संघ: 


ऋतुराज गायकवाड, रॉबिन उथप्पा, अंबाती रायुडू, शिवम दुबे, रविंद्र जडेजा (कर्णधार), एमएस धोनी (विकेटकीपर), ड्वेन प्रिटोरियस, ड्वेन ब्रावो, मिचेल सेंटनर, महेश तिक्षणा, मुकेश चौधरी.


- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.