PBKS vs CSK : आयपीएलमधील 2022 (IPL 2022) मधील आजच्या 38 व्या सामन्यात पंजाब किंग्स विरुद्ध चेन्नई सुपरकिंग्स (PBKS vs CSK) अशी लढत पार पडत आहे. सामन्यात पंजाबकडून अनुभवी फलंदाज शिखर धवन (Shikhar Dhawan) याने नाबाद 88 धावांची धडाकेबाज खेळी केली. तसंच भानुका राजपक्षा (Bhanuka Rajpaksha) याने देखील 42 धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली. त्यामुळे ज्याच्या जोरावर पंजाबने 187 धावांपर्यंत मजल मारली आहे. त्यामुळे आता चेन्नईला विजयासाठी 188 धावा करायच्या आहेत.


सामन्यात चेन्नई सुपरकिंग्सचा (Chennai Superkings) कर्णधार रवींद्र जाडेजा (Ravindra Jadeja) याने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. चेन्नईच्या गोलंदाजांनी सुरुवातीपासून अगदी चोख गोलंदाजी केली. त्यांनी बऱ्याच षटकापर्यंत पंजाबच्या फलंदाजांना रोखून धरलं. कर्णधार मयांकही स्वस्तात माघारी परतला. पण शिखरने एकहाती झुंज दिल्यामुळे पंजाब 187 धावांपर्यंत मजल मारण्यात यशस्वी झाला.



शिखरसह भानुकाची महत्त्वपूर्ण भागिदारी


सामन्यात सुरुवातीलाच पंजाबने त्यांचा कर्णधार मयांकला (Mayank Agarwal) 37 धावांवर गमावलं. त्यानंतर सलामीवीर शिखरने भानुका राजपक्षासोबत एक मोठी आणि भक्कम भागिदारी रचली. त्यानंतर 42 धावा करुन दोन चौकार आणि दोन षटकार ठोकत 32 चेंडूत 42 धावा करुन भानुका बाद झाला. पण शिखऱ क्रिजवर कायम होता. त्याने अखेरपर्यंत झुंज देत 59 चेंडूत नऊ चौकार आणि दोन षटकार ठोकत नाबाद 88 धावा केल्या. यावेळी लियाम यानेही सात चेंडूत 19 धावांची महत्त्वाची खेळी केली. ज्यामुळे पंजाबने 187 धावा स्कोरबोर्डवर लावल्या.


हे देखील वाचा-