MI vs PBKS, Match Live Update : पंजाबचा मुंबईवर 12 धावांनी विजय

IPL 2022 : आज पार पडणारा मुंबई इंडियन्स विरुद्ध पंजाब किंग्स सामना पुण्याच्या एमसीए स्टेडियमध्ये पार पडणार आहे.

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 13 Apr 2022 11:28 PM
MI vs PBKS : मुंबईला दुसरा झटका, ईशान किशन बाद

मुंबईची अवस्था बिकट झाल्याचं दिसत आहे. ईशान किशन 3 धावा करुन बाद झाला आहे.

MI vs PBKS : रोहित शर्मा बाद

मुंबईला मोठा झटका बसला असून रोहित शर्मा 28 धावा करुन नुकताच रबाडाच्या चेंडूवर झेलबाद झाला आहे.

MI vs PBKS : रोहितची तुफान फटकेबाजी सुरु

मुंबईच्या डावाला सुरुवात झाली असताना रोहितने तुफान फटकेबाजी सुरु केली आहे. त्याने तीन चौकारांसह एक षटकारही लगावला आहे. 3 षटकानंतर मुंबईचा स्कोर 25 धावा आहे.

MI vs PBKS : मुंबईचे सलामीवीर मैदानात

199 धावांचे आव्हान पार करण्यासाठी मुंबईचे सलामीवीर रोहित आणि ईशान मैदानात आले आहेत.

MI vs PBKS : मुंबईला विजयासाठी 199 धावांची गरज

अखेरच्या षटकात शाहरुख खानने दोन षटकार खेचल्याने 198 धावांपर्यंत पंजाबने मजल मारली आहे. आता विजयासाठी मुंबईला 199 धावांची गरज आहे.

MI vs PBKS : 18 षटकानंतर पंजाबचा स्कोर 174 वर 4 बाद

पंजाबच्या फलंदाजीच्या अखेरच्या दोन ओव्हर शिल्लक असून सध्या त्यांचा स्कोर 174 वर चार बाद असा आहे.

MI vs PBKS : गब्बर बाद, 70 धावा करुन तंबूत परत

दमदार फॉर्ममध्ये असलेला शिखर धवन बेसिल थम्पीच्या चेंडूवर पोलार्डच्या हाती झेलबाद झाला आहे. 

MI vs PBKS : मुंबईला तिसरं यश, लियाम लिव्हींगस्टोन बाद

जसप्रीत बुमराहने लियाम लिव्हींगस्टोनला त्रिफळाचीत केलं आहे. 130 धावांवर पंजाबने तीन गडी गमावले आहेत.

MI vs PBKS : जॉनी बाद, उनाडकटनं घेतली विकेट

पंजाबने आणखी एक गडी गमावला असून जॉनी बेअरस्टो 12 धावा करुन बाद झाला आहे.

MI vs PBKS : गब्बरचं अर्धशतक पूर्ण

मयांक बाद झाल्यानंतर शिखरनं संघाचा डाव सांभाळला असून त्याने नुकतचं अर्धशतक पूर्ण केलं आहे.

MI vs PBKS : पंजाब संघाचं शतक पूर्ण

पंजाब किंग्स संघाने 100 धावांचा टप्पा पार केला आहे. सध्या शिखर आणि जॉनी क्रिजवर आहेत.

MI vs PBKS : अर्धशतक ठोकून मयांक बाद

अर्धशतक झळकावल्यानंतर अखेर मयांक अगरवाल बाद झाला आहे. एम. आश्विनेच्या गोलंदाजीवर सूर्यकुमारने एक अप्रतिम झेल घेतला आहे. 

MI vs PBKS : मयांकची धमाकेदार खेळी, अर्धशतक पूर्ण

पंजाबचा कर्णधार मयांकने त्याचं अर्धशतक पूर्ण केलं आहे. शिखरसोबत मिळून तो एक चांगली भागिदारी रचत आहे. 9 षटकानंतर पंजाबची धावसंख्या 90 झाली आहे.

MI vs PBKS :  पंजाबची दणक्यात सुरुवात

MI vs PBKS : प्रथम फलंदाजी करणाऱ्या पंजाब संघाने दणक्यात सुरुवात केली आहे. सलामी फलंदाज मयांक अग्रवाल आणि शिखर धवन यांनी सहा षटकात 65 धावा चोपल्या आहेत. 

MI vs PBKS : सामन्याची सुरुवात चौकाराने

सामन्याला सुरुवात झाली असून बेसिल थम्पीच्या पहिल्याच चेंडूवर मयांक अगरवालने चौकार लगावला आहे.

MI vs PBKS : मुंबईने जिंकली नाणेफेक, प्रथम गोलंदाजीचा निर्णय़

मुंबई स्पर्धेतील पाचवा सामना पंजाबविरुद्ध खेळत असून नुकतीच नाणेफेक मुंबईने जिंकली आहे. प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला आहे.

MI vs PBKS : सामना सुरु होण्यासाठी काही काळच शिल्लक

मुंबई विरुद्ध पंजाब सामना सुरु होण्यासाठी काही मिनिटं शिल्लक आहेत.


 





MI vs PBKS : पंजाब संभाव्य अंतिम 11  

मयांक अगरवाल (कर्णधार), शिखर धवन, लियाम लिव्हिंगस्टोन, भानुका राजपक्षा (विकेटकीपर), शाहरुख खान, ओडियन स्मिथ, राज बावा, अर्शदीप सिंग, हरप्रीत ब्रार, संदीप शर्मा, राहुल चाहर

MI vs PBKS : मुंबई संभाव्य अंतिम 11  

रोहित शर्मा (कर्णधार), ईशान किशन (विकेटकिपर), सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, किरॉन पोलार्ड, टीम डेव्हिड, डॅनियल सॅम्स, मुरुगन आश्विन, जसप्रीत बुमराह, टायमल मिल्स, बेसिल थम्पी.   


 


 

MI vs PBKS Head to head : आजवर मुंबई विरुद्ध पंजाब

आयपीएलमध्ये आजवर मुंबई इंडियन्स विरुद्ध पंजाब किंग्स हे संघ तब्बल 27 वेळा एकमेंकाविरुद्ध मैदानात उतरले आहेत. या सर्व सामन्यांचा विचार करता दोन्ही संघानी एकमेकांना चुरशीची टक्कर दिली आहे. मुंबईने पंजाबपेक्षा केवळ एक सामना अधिक जिंकला आहे. चेन्नईने 27 पैकी 14 सामने तर पंजाबने 13 सामन्यात विजय मिळवला आहे.


 

MI vs PBKS : आज मुंबई विरुद्ध पंजाब

आज मुंबई इंडियन्स आणि पंजाब किंग्समध्ये सामना पार पडणार आहे.


पार्श्वभूमी

MI vs PBKS, Live Score : आयपीएलमधील (IPL 2022) आजचा 23 वा सामना मुंबई इंडियन्स आणि पंजाब किंग्स (MI vs PBKS) या दोन संघात पार पडत आहे. यंदाच्या हंगामात मुंबईला चार पैकी चार सामने गमवावे लागले असल्याने त्यांना आजतरी विजयाचं खातं उघडता येणार का? हा सर्वात मोठा प्रश्न आहे. तर दुसरीकडे पंजाबने चार पैकी दोन सामने गमावून दोन जिंकले असल्याने त्याचा फॉर्म बऱ्यापैकी चांगला जिस आहे. तर आजचा सामना कुणाच्या दिशेने झुकणार हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.


आयपीएलमध्ये आजवर मुंबई इंडियन्स विरुद्ध पंजाब किंग्स हे संघ तब्बल 27 वेळा एकमेंकाविरुद्ध मैदानात उतरले आहेत. या सर्व सामन्यांचा विचार करता दोन्ही संघानी एकमेकांना चुरशीची टक्कर दिली आहे. मुंबईने पंजाबपेक्षा केवळ एक सामना अधिक जिंकला आहे. चेन्नईने 27 पैकी 14 सामने तर पंजाबने 13 सामन्यात विजय मिळवला आहे.


कसा आहे पिच रिपोर्ट?


आजचा सामना पुण्यातील एमसीए मैदानात (MCA Stadium) पार पडणार आहे. पुण्यातील आजच्या वातावरणाचा विचार करता सायंकाळी सामना असला तरी हवामान बऱ्यापैकी उष्ण असल्याने दवाची अडचण अधिक येणार नाही, अशी आशा व्यक्त केली जात आहे. त्यामुळे दवामुळे आजच्या सामन्याचा विजेता ठरला जाणार नसून दमदार खेळी करणारा संघच आज विजय मिळवेल. 


मुंबई संभाव्य अंतिम 11  


रोहित शर्मा (कर्णधार), ईशान किशन (विकेटकिपर), सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, किरॉन पोलार्ड, टीम डेव्हिड, डॅनियल सॅम्स, मुरुगन आश्विन, जसप्रीत बुमराह, टायमल मिल्स, बेसिल थम्पी.   


पंजाब संभाव्य अंतिम 11  


मयांक अगरवाल (कर्णधार), शिखर धवन, लियाम लिव्हिंगस्टोन, भानुका राजपक्षा (विकेटकीपर), शाहरुख खान, ओडियन स्मिथ, राज बावा, अर्शदीप सिंग, हरप्रीत ब्रार, संदीप शर्मा, राहुल चाहर


महत्त्वाच्या इतर बातम्या :


- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.