MI vs CSK Match Live Update : धोनीने मारले, मुंबईचा पराभव, चेन्नईचा तीन विकेटनं विजय

IPL 2022, MI vs CSK Match Live Update : आयपीएलमधील कट्टर प्रतिस्पर्धी आमने-सामने, रोहित शर्मा आणि रविंद्र जाडेजा यांच्यात होणार सामना

नामदेव कुंभार Last Updated: 21 Apr 2022 11:26 PM
MI vs CSK Match Live Update : धोनीने मारले, चेन्नईचा तीन विकेटनं विजय

MI vs CSK Match Live Update : धोनीने अखेरच्या षटकात 17 धावा मारत चेन्नईला तीन विकेटनं सामना जिंकून दिला. 

MI vs CSK Match Live Update : चेन्नईला सातवा धक्का, विजयासाठी पाच चेंडूत 17 धावांची गरज

MI vs CSK Match Live Update : सहा चेंडूत 17 धावांची गरज असताना चेन्नईला प्रिटोरिसच्या रुपाने सातवा धक्का बसला आहे. प्रिटोरिसने 14 चेंडूत 22 धावांची खेळी केली. चेन्नईला विजयासाठी पाच चेंडूत 17 धावांची गरज 

MI vs CSK Match Live Update : सहा चेंडूत 17 धावांची गरज

MI vs CSK Match Live Update :चेन्नईला विजयासाठी सहा चेंडूत 17 धावांची गरज आहे. प्रिटोरिस आणि धोनी मैदानावर आहेत. 

MI vs CSK Match Live Update : चेन्नईला मोठा धक्का, कर्णधार रविंद्र जाडेजा बाद

MI vs CSK Match Live Update :रायली मॅरिडेथनं रविंद्र जाडेजाला बाद करत मुंबईला सहावं यश मिळवून दिलेय. जाडेजा तीन धावा काढून तंबूत परतला.

MI vs CSK Match Live Update : चेन्नईचा अर्धा संघ तंबूत, रायडू बाद

डॅनिअल सॅम्सने जम बसलेल्या रायडूला बाद करत मुंबईला पाचवं यश मिळवून दिले. रायडू 40 धावा काढून माघारी परतला. डॅनिअल सॅम्सने चौथी विकेट घेतली.

MI vs CSK Match Live Update : डॅनिअल सॅम्सचा चेन्नईला चौथा धक्का, शिवम दुबे बाद

MI vs CSK Match Live Update : डॅनिअल सॅम्सने शिवम दुबेला बाद करत मुंबईला चौथं यश मिळवून दिलेय. दुबे 12 धावा काढून तंबूत परतला. चेन्नई चार बाद 88

MI vs CSK Match Live Update : चेन्नईला तिसरा धक्का, उथप्पा बाद

MI vs CSK Match Live Update :   जयदेव उनाडकद याने रॉबिन उथप्पाला बाद करत चेन्नईला तिसरा धक्का दिला आहे. उथप्पा 30 धावा काढून बाद... चेन्नई तीन बाद 66 धावा

MI vs CSK Match Live Update : चेन्नईला दुसरा धक्का, मिचेल सँटनर बाद

MI vs CSK Match Live Update :  मिचेल सँटनर बाद करत डॅनिअल सॅम्सने चेन्नईला दुसरा धक्का दिला. मिचेल सँटरनर 11 धावा काढून बाद झाला. उथप्पा आणि रायडू सध्या मैदानावर आहेत. चेन्नईच्या दोन बाद 39 धावा

MI vs CSK Match Live Update : चेन्नईला पहिला धक्का, ऋतुराज गायकवाड बाद

MI vs CSK Match Live Update : 156 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करणाऱ्या चेन्नईची सुरुवात खराब झाली आहे. ऋतुराज गायकवाड शून्य धावसंख्येवर बाद झाला. डॅनिअल सॅम्सने ऋतुराज गायकवाडला शून्य धावसंख्येवर बाद केले. 

MI vs CSK Match Live Update : तिलक वर्माची एकाकी झुंज, मुंबईची 155 धावांपर्यंत मजल

MI vs CSK Match Live Update :  तिलक वर्माच्या संयमी फलंदाजीच्या जोरावर मुंबईने निर्धारित 20 षटकांत सात बाद 155 धावांपर्यंत मजल मारली. 

MI vs CSK Match Live Update : तिलक वर्माची एकाकी झुंज, झळकावले संयमी अर्धशतक 

MI vs CSK Match Live Update :  एका बाजूला विकेट पडत असताना तिलक वर्माने संयमी फलंदाजी केली. रोहित शर्मा, ईशान किशन, सूर्यकुमार यादव आणि पोलार्डसारखे फलंदाज अपयशी ठरले. मुंबईचा संघ अडचणीत सापडला असतानाच तिलक वर्माने संयमी फलंदाजी करत अर्धशतक झळकावले. 42 चेंडूत तिलक वर्माने अर्धशतक झळकावले. या खेळीदरम्यान तिलक वर्माने दोन षटकार आणि तीन चौकार लगावले. 

MI vs CSK Match Live Update : मुंबईला सातवा धक्का, डॅनिअल सॅम्स तंबूत

MI vs CSK Match Live Update : मुंबईच्या फलंदाजांची हराकिरी दिसत आहे. तिलक वर्माचा अपवाद वगळता एकाही फलंदाजाला मैदानावर थांबता आलेलं नाही. ये रे माझ्या मागल्या असे म्हणत मुंबईचे फलंदाज एकामागोग बाद होत आहे. डॅनिअल सॅम्सच्या रुपात मुंबईला सातवा धक्का बसला आहे. 

MI vs CSK Match Live Update : मुंबईला सहावा धक्का, पोलार्डही बाद

MI vs CSK Match Live Update :  मुंबई इंडियन्सला एकापाठोपाठ एक धक्के बसत आहे. महेश तिक्षणाने पोलार्डला बाद करत मुंबईला सहावा धक्का दिला. मुंबई सहा बाद 111 धावा

MI vs CSK Match Live Update : मुंबईचा अर्धा संघ तंबूत

MI vs CSK Match Live Update : मुंबई इंडियन्सचा अर्धा संघ तंबूत परतला आहे. ह्रतिक शॉकिनही बाद झाला. मुंबई पाच बाद 105 धावा.. पोलार्ड आणि तिलक वर्मा मैदानावर

MI vs CSK Match Live Update : तिलक वर्मा-ह्रतिक शॉकिन यांनी मुंबईचा डाव सावरला

MI vs CSK Match Live Update :  आघाडीचे फलंदाज बाद झाल्यानंतर तिलक वर्मा-ह्रतिक शॉकिन यांनी मुंबईचा डाव सावरला. 13 षटकानंतर मुंबई 4 बाद 85 धावा

MI vs CSK Match Live Update : मुंबईची फलंदाजी ढेपाळली, 50 धावांच्या आत 4 फलंदाज तंबूत

MI vs CSK Match Live Update :  करो या मरोच्या सामन्यात चेन्नईच्या भेदक माऱ्यापुढं मुंबईच्या फलंदाजांनी गुडघे टेकले. रोहित शर्मा, ईशान किशन, ब्रेविसनंतर विश्वासू सूर्यकुमार यादवही माघारी परतला. मिचेल सॅंटनरनं 32 धावांवर सूर्यकुमारला बाद केलं. मु्ंबई चार बाद 48 धावा.


 

MI vs CSK Match Live Update : मुकेश चौधरीचा भेदक मारा, मुंबईच्या तीन फलंदाजाला धाडलं माघारी

मुंबई विरुद्ध सुरु असलेल्या आयपीएलच्या 33 व्या सामन्यात चेन्नईचा गोलंदाज मुकेश चौधरीनं भेदक गोलंदाजी केली आहे. त्यानं मुंबईच्या तीन फलंदाजाला माघारी धाडलं आहे. 


 

MI vs CSK Match Live Update : रोहित शर्मानंतर इशानही बाद, मुंबईची बिकट अवस्था

MI vs CSK Match Live Update : कर्णधार रोहित शर्मानंतर ईशान किशनही बाद झाला आहे. दोघेही गोल्डन डक झाले आहेत. मुकेश चौधरीच्या अप्रतिम यॉर्करवर ईशान किशन त्रिफाळाचीत झाला. मुंबई दोन बाद दोन धावा...

MI vs CSK Match Live Update : मुंबईला मोठा धक्का, कर्णधार रोहित शर्मा बाद

MI vs CSK Match Live Update : मुंबईचा कर्णधार रोहित शर्मा पहिल्याच चेंडूवर बाद झाला. मुकेश चौधरीने रोहित शर्माला सँटरनकरवी झेलबाद केले. मोक्याच्या सामन्यात रोहित शर्मा पुन्हा एकदा फ्लॉप झाला आहे. 

MI vs CSK Match Live Update : मुंबई- चेन्नईच्या संघात बदल

MI vs CSK Match Live Update :  महत्वाच्या सामन्यात मुंबईच्या संघात तीन बदल करण्यात आले आहेत. मुंबईने रायली मेरीडेथ, ह्रतिक शॉकिन आणि डॅनिअल सॅम यांना संघात संधी दिली आहे. रॅली मेरीडेथ हा वेगवान गोलंदाज आहे. तर ह्रतिक शॉकिन हा फिरकी गोलंदाज आहे. चेन्नईच्या संघातील डाव्या हाताचे फलंदाज असल्यामुळे मुंबईने शॉकिनला खेळवण्याचा निर्णय घेतला आहे. महत्वाच्या सामन्यात चेन्नईने आपल्या संघात दोन मोठे बदल केले आहेत. चेन्नईने मोईन अली आणि ख्रिस जॉर्नला बाहेरचा रस्ता दाखवला आहे. त्यांच्याजागी  ड्वेन प्रिटोरियस आणि मिचेल सँटनेरला संधी देण्यात आली आहे. 

MI vs CSK Match Live Update : चेन्नईचे 11 किंग्स कोण?

MI vs CSK Match Live Update : ऋतुराज गायकवाड, रॉबिन उथप्पा, अंबाती रायडू, शिवम दुबे, रविंद्र जाडेजा (कर्णधार), एम. एस धोनी (विकेटकिपर), मिचेल सँटनर,  ड्वेन प्रिटोरियस, डेवेन ब्राव्हो, मुकेश चौधरी, महेश तिक्षणा.

MI vs CSK Match Live Update : कसा आहे मुंबईचा संघ?

MI vs CSK Match Live Update :
ईशान किशन (विकेटकिपर), रोहित शर्मा (कर्णधार), डेवॉल्ड ब्रेविस, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, कायरन पोलार्ड, डॅनिअल सॅम्स, रायली मेरेडेथ, ह्रतिक शॉकिन, जयदेव उनादकट, जसप्रीत बुमराह.

MI vs CSK Match Live Update : चेन्नईने नाणेफेक जिंकली, प्रथम गोलंदाजीचा निर्णय

MI vs CSK Match Live Update :चेन्नईचा कर्णधार रविंद्र जाडेजाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे मुंबई संघ प्रथम फलंदाजीसाठी मैदानात उतरेल. नवी मुंबईच्या डी वाय पाटील स्टेडिअममध्ये सामना होणार आहे. 

MI vs CSK Match Live Update : थोड्याच वेळात होणार सामन्याला सुरुवात

MI vs CSK Match Live Update : मुंबई आणि चेन्नई यांच्यातील सामन्याला थोड्याच वेळात सुरुवात होणार आहे. नवी मुंबईच्या डी वाय पाटील स्टेडियममध्ये सामना होणार आहे. नाणेफेकीचा कौल महत्वचा ठरणार आहे. मुंबईसाठी हा सामना करो या मरो आहे...





MI vs CSK Match Live Update : चेन्नईसाठी जमेची आणि कमकुवत बाजू काय?

MI vs CSK Match Live Update : चेन्नईसाठी जमेची बाजू म्हणजे सलामी फलंदाज ऋतुराज गायकवाड फॉर्ममध्ये परतला आहे. गायकवाडने गुजरातविरोधात दमदार अर्धशतकी खेळी केली. रॉबिन उथप्पा आणि शिवम दुबे यांनी आरसीबीविरोधात तुफानी फलंदाजी केली होती. चेन्नईची चिंतेची बाजू म्हणजे  अंबाती रायुडू आणि मोईन अली यांना आपल्या लौकिकास साजेशी कामगिरी करता आलेली नाही.  जाडेजालीही लौकिकास साजेशी कामगिरी करता आलेली नाही. राहुल चाहरच्या अनुपस्थितीत चेन्नईची गोलंदाजी कमकुवत दिसत आहे. ड्वेन ब्रावो आणि स्पिनर महेश तीक्ष्णा यांचा अपवाद वगळता चेन्नईच्या गोलंदाजांना भेदक मारा करण्यात अपयश आलेय.


 

MI vs CSK Match Live Update : मुंबईची जमेची बाजू काय? काय आहे कमकुवत बाजू

MI vs CSK Match Live Update : मुंबईसाठी सर्वात मोठी चिंता कर्णधार रोहित शर्माचा फॉर्म आहे. रोहित शर्माला अद्याप आपल्या लौकिकास साजेशी कामगीर करता आलेली नाही. रोहितने सहा सामन्यात फक्त 114 धावा काढल्या आहेत. मुंबई मोठी धावसंख्या उभा करायची असल्यास अथवा धावांचा पाठलाग करायचा असल्यास रोहित शर्माची फलंदाजी महत्वाची आहे.  कायरन पोलार्ड, इशान किशन यांनाही आपल्या लौकिकास साजेशी कामगिरी करता आलेली नाही. 15.5 कोटी रुपयात खरेदी केलेल्या ईशान किशनने सहा सामन्यात दोन अर्धशतकाच्या मदतीने 191 धावा चोपल्यात. डेवाल्ड ब्रेविस, तिलक वर्मा आणि सूर्यकुमार यादव चांगल्या लयीत आहेत. मात्र, त्यांना इतर फलंदाजांकडून साथ मिळत नाही.  फलंदाजीसोबत मुंबईची गोलंदाजीही कमकुवत जाणवत आहे. बुमराहचा अपवाद वगळता एकाही गोलंदाजाला विकेट घेण्यात अथवा धावा रोखण्यात यश आलेलं नाही. टायमल मिल्स, जयदेव उनादकट, बासिल थंपी आणि मुरुगन अश्विन यांना आपल्या लौकिकास साजेशी खेळी करता आलेली नाही. 

MI vs CSK Match Live Update : बुमराह आज 200 वा टी-20 सामना खेळणार

MI vs CSK Match Live Update : चेन्नईविरुद्ध आज खेळला जाणारा सामना जसप्रीत बुमराहच्या कारकिर्दीतला 200 वा टी-20 सामना असेल. त्यानं आतापर्यंत 199 टी-20 सामने खेळले आहेत. ज्यात 242 विकेट घेतले आहेत. जगातील सर्वात खतरनाक गोलंदाजामध्ये बुमराहचं नाव घेतलं जातं.  त्यानं 57 आंतरराष्ट्रीय टी-20 सामन्यात 67 विकेट घेतले आहेत. तर, आयपीएलमध्ये त्यानं 112 सामने खेळले असून 134 विकेट्स मिळवले आहेत.

MI vs CSK Match Live Update : एकटाच पडला बुमराह

MI vs CSK Match Live Update : जसप्रीत बुमराहच्या तोडीचा गोलंदाज मुंबई इंडियन्सकडे नाही. लसिथ मलिंगा, ट्रेन्ट बोल्ट यांच्यानंतर मुंबईला तसा गोलंदाज मिळाला नाही. त्यामुळे गोलंदाजीचा सर्व भार एकट्या बुमराहवर पडला आहे. थंपी, जयदेव उनादकट, एम अश्विन आणि मिल्स यांना धारधार गोलंदाजी करता आलेली नाही. विकेट घेण्यात तर अपयश आलेच, शिवाय धावाही रोखता आलेल्या नाहीत. त्यामुळे मुंबईची गोलंदाजी कमकुवत जाणवत आहे.

MI vs CSK Match Live Update : हेड टू हेड रेकॉर्ड

MI vs CSK Match Live Update : मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्जला आयपीएलमधील सर्वात यशस्वी संघ म्हणून ओळखलं जातं. मात्र, आयपीएलच्या पंधराव्या हंगामात दोन्ही संघाची कामगिरी खराब ठरली आहे. आयपीएलमध्ये मुंबई आणि चेन्नईचा संघ 32 वेळा आमने सामने आले आहेत. त्यापैकी 19 वेळा मुंबईच्या संघानं विजय मिळवला आहे. तर, 13 वेळा चेन्नईच्या संघानं मुंबईला पराभूत केलं आहे.

MI vs CSK Match Live Update : मैदानावर उतरताच उथप्पाच्या नावावर होणार मोठा विक्रम

MI vs CSK Match Live Update : नवी मुंबईतील डी वाय पाटील स्टेडिअममध्ये चेन्नई आणि मुंबईमध्ये सामना रंगणार आहे. या सामन्यात मैदानावर उतरताच उथप्पा मोठा विक्रम करणार आहे. रॉबिन उथप्पा आज आयपीएलमध्ये 200 वा सामना खेळणार आहे. उथप्पाने आयपीएल करिअरमध्ये 199 सामन्यात 28.10 च्या सरासरीने 4919 धावा चोपल्या आहेत. आयपीएलमध्ये 200 सामने खेळणारा उथप्पा सातवा खेळाडू होणार आहे. एमएस धोनी, दिनेश कार्तिक, रोहित सर्मा, विराट कोहली, रविंद्र जाडेजा आणि सुरेश रैना यांनी आयपीएलमध्ये 200 सामने खेळले आहेत. यांच्या पंक्तीत बसण्याचा मान उथप्पाला मिळणार आहे. 

MI vs CSK Match Live Update : मुंबई-चेन्नईचा सामना म्हणजे भारत-पाकिस्तानचा महामुकाबला- हरजभजन सिंह

MI vs CSK Match Live Update : तब्बल 10 वर्ष मुंबईच्या संघाकडून खेळल्यानंतर मी पहिल्यांदा चेन्नईची जर्सी घातली तेव्हा मला विचित्र वाटलं. हे दोन्ही संघ माझ्यासाठी खूप खास आहेत. मुंबई-चेन्नई यांच्यातील सामना मला भारत आणि पाकिस्तान यांच्यातील महामुकाबल्यासारखा वाटतो. जेव्हा मी मुंबईविरुद्ध पहिल्यांदा मैदानात उतरलो तेव्हा मला सामना लवकर संपवायचा होता. कारण, त्यात दडपण आणि भावना या दोन्ही गोष्टींचा समावेश होता. सुदैवानं सामना लवकर संपला. हा सामना चेन्नईनं जिंकला, असे हरभजन स्टार स्पोर्ट्सच्या शो क्रिकेट लाइव्हमध्ये बोलताना म्हणाला. 

MI vs CSK Match Live Update : रोहित शर्मा आणि ईशान किशन यांनी वाढवली मुंबईची चिंता

MI vs CSK Match Live Update : मुंबई इंडियन्ससाठी सर्वात मोठी चिंतेची बाब म्हणजे रोहित शर्मा आणि ईशान किशन यांचा फॉर्म होय. या दोन्ही फलंदाजाला आपल्या लौकिकास साजेशी कामगिरी करता आलेली नाही. 15 कोटींपेक्षा जास्त रुपयांना खरेदी केलेल्या ईशान किशानला कामगिरीत सातत्या राखता आलेलं नाही. ईशान किशन संघर्ष करताना दिसत आहे. पहिल्या दोन सामन्यात ईशान किशनने दमदार खेळी केली, पण त्यानंतर बॅट शांतच राहिली. विस्फोटक फलंदाज म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ईशान किशन आणि रोहित शर्माला मोठी सलामी देण्यात अपयश आले आहे. रोहित शर्माने 19 च्या सरासरी फक्त 114 धावा केल्या आहेत.  सहा डावात रोहित शर्माने 41, 10, 3, 26, 28, 6 इतक्या धावा केल्या आहेत. रोहित आणि ईशान किशान यांचा फॉर्म ईशान किशनसाठी चिंतेचा विषय ठरत आहे. 

पार्श्वभूमी

IPL 2022, MI vs CSK Match Live Update : आयपीएल इतिहासातील दोन सर्वात यशस्वी संघ मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्स (MI vs CSK) आज (गुरूवार) आमनेसामेने येणार आहेत. नवी मुंबईतील डी वाय पाटील स्टेडिअममध्ये हा सामना रंगणार आहे. मुंबई इंडियन्सनं (Mumbai Indians) आतापर्यंत पाच वेळा तर चेन्नई सुपर किंग्सनं (Chennai Super Kings) चार वेळा आयपीएल स्पर्धा जिंकली आहे. पण यंदा या दोन्ही संघाला आपल्या लौकिकास साजेशी कामगिरी करता आलेली नाही. मुंबईला सलग सहा सामन्यात तर मुंबईला आतापर्यंत पाच सामन्यात पराभवाचा सामना करावा लागलाय. आयपीएलमधील सर्वात यशस्वी संघ आयपीएलमधील आपले आव्हान जिवंत ठेवण्यासाठी एकमेंकासमोर उभे राहतील. 


मुंबईसाठी सर्वात मोठी चिंता कर्णधार रोहित शर्माचा फॉर्म आहे. रोहित शर्माला अद्याप आपल्या लौकिकास साजेशी कामगीर करता आलेली नाही. रोहितने सहा सामन्यात फक्त 114 धावा काढल्या आहेत. मुंबई मोठी धावसंख्या उभा करायची असल्यास अथवा धावांचा पाठलाग करायचा असल्यास रोहित शर्माची फलंदाजी महत्वाची आहे.  कायरन पोलार्ड, इशान किशन यांनाही आपल्या लौकिकास साजेशी कामगिरी करता आलेली नाही. 15.5 कोटी रुपयात खरेदी केलेल्या ईशान किशनने सहा सामन्यात दोन अर्धशतकाच्या मदतीने 191 धावा चोपल्यात. डेवाल्ड ब्रेविस, तिलक वर्मा आणि सूर्यकुमार यादव चांगल्या लयीत आहेत. मात्र, त्यांना इतर फलंदाजांकडून साथ मिळत नाही.  फलंदाजीसोबत मुंबईची गोलंदाजीही कमकुवत जाणवत आहे. बुमराहचा अपवाद वगळता एकाही गोलंदाजाला विकेट घेण्यात अथवा धावा रोखण्यात यश आलेलं नाही. टायमल मिल्स, जयदेव उनादकट, बासिल थंपी आणि मुरुगन अश्विन यांना आपल्या लौकिकास साजेशी खेळी करता आलेली नाही. 


 चेन्नईसाठी जमेची बाजू म्हणजे सलामी फलंदाज ऋतुराज गायकवाड फॉर्ममध्ये परतला आहे. गायकवाडने गुजरातविरोधात दमदार अर्धशतकी खेळी केली. रॉबिन उथप्पा आणि शिवम दुबे यांनी आरसीबीविरोधात तुफानी फलंदाजी केली होती. चेन्नईची चिंतेची बाजू म्हणजे  अंबाती रायुडू आणि मोईन अली यांना आपल्या लौकिकास साजेशी कामगिरी करता आलेली नाही.  जाडेजालीही लौकिकास साजेशी कामगिरी करता आलेली नाही. राहुल चाहरच्या अनुपस्थितीत चेन्नईची गोलंदाजी कमकुवत दिसत आहे. ड्वेन ब्रावो आणि स्पिनर महेश तीक्ष्णा यांचा अपवाद वगळता चेन्नईच्या गोलंदाजांना भेदक मारा करण्यात अपयश आलेय.


हेड टू हेड रेकॉर्ड
मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्जला आयपीएलमधील सर्वात यशस्वी संघ म्हणून ओळखलं जातं. मात्र, आयपीएलच्या पंधराव्या हंगामात दोन्ही संघाची कामगिरी खराब ठरली आहे. आयपीएलमध्ये मुंबई आणि चेन्नईचा संघ 32 वेळा आमने सामने आले आहेत. त्यापैकी 19 वेळा मुंबईच्या संघानं विजय मिळवला आहे. तर, 13 वेळा चेन्नईच्या संघानं मुंबईला पराभूत केलं आहे. 

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.