MI vs CSK: आयपीएलच्या पंधराव्या हंगामातील 30 व्या सामन्यात मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज (Mumbai Indians vs Chennai Super Kings) एकमेकांशी भिडणार आहेत. मुंबईच्या (Mumbai) डीवाय पाटील स्टेडियमवर (DY Patil Sports Academy) हा सामना रंगणार आहे. आयपीएलच्या पंधराव्या हंगामात मुंबई आणि चेन्नईच्या संघानं निराशाजक कामगिरी केली आहे. मुंबईच्या संघानं सलग सहा सामने गमावले आहेत. दुसरीकडं चेन्नईच्या संघालाही काही खास कामगिरी करता आली नाही. चेन्नईच्या संघाला सहा पैकी केवळ एकाच सामन्यात विजय मिळवता आला आहे. आजच्या सामन्यात मुंबईचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह नव्या विक्रमाला गमवणी घालणार आहे.
दरम्यान, मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्जला आयपीएलमधील सर्वात यशस्वी संघ म्हणून ओळखलं जातं. मात्र, आयपीएलच्या पंधराव्या हंगामात दोन्ही संघाची कामगिरी खराब ठरली आहे. आयपीएलमध्ये मुंबई आणि चेन्नईचा संघ 32 वेळा आमने सामने आले आहेत. त्यापैकी 19 वेळा मुंबईच्या संघानं विजय मिळवला आहे. तर, 13 वेळा चेन्नईच्या संघानं मुंबईला पराभूत केलं आहे.
बुमराह 200 वा टी-20 सामना खेळणार
चेन्नईविरुद्ध आज खेळला जाणारा सामना जसप्रीत बुमराहच्या कारकिर्दीतला 200 वा टी-20 सामना असेल. त्यानं आतापर्यंत 199 टी-20 सामने खेळले आहेत. ज्यात 242 विकेट घेतले आहेत. जगातील सर्वात खतरनाक गोलंदाजामध्ये बुमराहचं नाव घेतलं जातं. त्यानं 57 आंतरराष्ट्रीय टी-20 सामन्यात 67 विकेट घेतले आहेत. तर, आयपीएलमध्ये त्यानं 112 सामने खेळले असून 134 विकेट्स मिळवले आहेत.
रॉबिन उथप्पा 5000 धावांचा टप्पा गाठणार
चेन्नईचा मधल्या फळीचा फलंदाज रॉबिन उथप्पासाठी आजचा सामना खास ठरण्याची शक्यता आहे. रॉबिन उथप्पा आज आयपीएलमधील त्याचा 200 सामना खेळणार आहे. तसेच 5000 धावांचा टप्पा गाठण्यापासून तो फक्त 81 धावा दूर आहे. त्यानं 199 सामन्यात 4 हजार 919 धावा केल्या आहेत. त्याचा आयपीएलमधील सर्वाधिक स्कोर 88 आहे. तसेच त्याच्या नावावर 27 अर्धशतकांची नोंद आहे.
हे देखील वाचा-
- Kuldeep Yadav: मनं जिंकलीस भावा! 'मॅन ऑफ द मॅच'चा पुरस्कार घेताना कुलदीप यादव नक्की काय म्हणाला?
- IPL Points Table 2022 : आयपीएल पॉईंट्स टेबलमध्ये गुजरात टॉपवर; ऑरेंज आणि पर्पल कॅपवर राजस्थानचा कब्जा
- Kieron Pollard retirement : मुंबई इंडियन्सच्या कायरन पोलार्डचा आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा