Hugh Edmeades Faints: आयपीएलचा मेगा ऑक्शन सुरु असताना सुत्रसंचालन करणारे ह्यू एडमिड्स भोवळ येऊन खाली कोसळल्याची घटना घडलीय. ज्यामुळं आयपीएलचं मेगा ऑक्शन तात्पुरतं थांबवण्यात आलंय. त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती समोर आलीय. लवकरच आयपीएलच्या मेगा ऑक्शनला दुपारी 3.30 वाजता सुरुवात होणार आहे.
आयपीएलच्या 15 व्या पर्वासाठीच्या दोन दिवसीय लिलावाची आजपासून बंगळुरु येथे सुरुवात झाली. आज या मेगा ऑक्शनचा पहिला दिवस आहे. दरम्यान, श्रीलंकेचा फिरकीपटू वनिंदू हसरंगासाठी बोली लावली जात असताना ऑक्शनर ह्यू एडमीड्स अचानक जमिनीवर कोसळले. त्यामुळं ऑक्शन थांबवण्यात आलं. सध्या ऑक्शन थांबवण्यात आलं असून लंचची घोषणा करण्यात आलीय.
ह्यू एडमीड्स यांचा अनुभव
ह्यू एडमीड्स यांना ऑक्शन आयोजित करण्याचा 35 वर्षांपेक्षा अधिक अनुभव आहे. त्यांनी जागतिक स्तरावर 2,500 हून अधिक ऑक्शन सुत्रसंचालन केलं आहे. याशिवाय, त्यांन 2.7 बिलियन पौंड्सच्या तब्बल 310,000 लॉट पेक्षा जास्त खेळाडू, वस्तू आणि इतर गोष्टींचं ऑक्शन केलंय.
आयपीएलच्या मेगा ऑक्शनमध्ये एकूण 600 खेळाडूंवर लागणार बोली
आयपीएलच्या मेगा ऑक्शनमध्ये एकूण 590 खेळाडूंवर बोली लावली जाणार होती. बीसीसीआयनं यात 10 नव्या खेळाडूंचा समावेश केलाय. ज्यामुळं 590 ऐवजी 600 खेळांडूवर बोली लावली जाणार आहे. आतापर्यंत एकूण 24 खेळाडूंचं ऑक्शन झालंय. त्यापैकी 20 खेळाडूंना फ्रँचायझीनं खरेदी केलंय. तर, 4 खेळाडू अनसोल्ड ठरले आहेत.
हे देखील वाचा-
- IPL 2022 Auction Preity Zinta : आयपीएल लिलावात प्रीती झिंटा गैरहजर; 'हे' आहे कारण
- IPL 2022 Auction : 370 भारतीय आणि 220 परदेशी खेळाडू, पाहा संपूर्ण 590 खेळाडूंची यादी
- Pooja Vastrakar : 'जास्त प्रयोग करण्यापेक्षा माझ्या ताकतीचा वापर करेन': पूजा वस्त्राकर
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha