Pooja Vastrakar : आजपासून (12 फेब्रुवारी) सुरू होणाऱ्या न्यूझीलंडविरुद्धच्या एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत जास्त प्रयोग करण्याऐवजी ताकतीचा वापर करून खेळायल आवडेल, असे भारतीय महिला वेगवान गोलंदाज पूजा वस्त्राकरने (pooja vastrakar) सांगितले. पूजाने न्यूझीलंड दौऱ्यात चांगली सुरुवात केली आणि T20 अंतरराष्ट्रीय सामन्यात दोन विकेट घेतल्या.


पूजाने 11 फेब्रुवारीला झालेल्या वर्च्युअल पत्रकार परिषदेमध्ये सांगितले, 'इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया दौरा हा माझ्यासाठी फारसा चांगला नव्हता.  मी खूप मेहनत घेतली. मला प्रशिक्षक आणि सीनियर खेळाडू यांनी बरेच सल्ले दिले. मी त्यांचा सल्ला ऐकून त्यानुसार प्रॅक्टिस केली. सातत्य राखण्यासाठी भरपूर सराव केला. मला त्याचा ऑस्ट्रेलियामधील वन डे मॅचमध्ये फायदा झाला.'. पुढे पूजानं सांगितलं, 'ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड आणि इंग्लंडमध्ये गोलंदाजी करणं हे प्रत्येक गोलंदाजाचं स्वप्न असतं. मला काहीही वेगळं करायचं नाहिय. जास्त प्रयोग करण्यापेक्षा माझ्या तकदीचा वापर करेन '


फलंदाजीबद्दल बोलताना पूजा म्हणाली, 'शेवटची 10 षटके नेहमीच महत्त्वाची असतात. त्यामुळे आम्ही बंगळुरूमध्ये त्यावर काम केले. आमचे फलंदाजी प्रशिक्षक आम्हाला या टप्प्यावर  60 पेक्षा जास्त धावा करण्याचे लक्ष्य द्यायचे.' टीममधील विकेटकीपर  तानिया भाटियानं सांगितलं की, तिनं 'पॉवर हिटिंग'वर लक्ष केंद्रित केले आहे.


हे देखील वाचा- 



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha