IPL 2022 Mega Auction : आयपीएलच्या 2022 हंगामाचा लिलाव सुरु झाला आहे. यामध्ये पहिली बोली भारतीय क्रिकेटपटू शिखर धवनकडून (Shikhar Dhawan) आली. त्याला पंजाब किंग्सने (Punjab Kings) 8.25 कोटींना विकत घेतले आहे. तर राजस्थान रॉयल्सने (Rajsthan Royals) ऑफस्पिनर आर अश्विनला (Ravichandran Ashwin) पाच कोटी रुपयांना विकत घेतले आहे.


आयपीएलच्या शेवटच्या हंगामात म्हणजेच आयपीएल 2021 (IPL 2021) मध्ये धवन दिल्ली कॅपिटल्स (Delhi Capitals) संघाचा भाग होता. पण यावेळी तो पंजाब किंग्जशी जोडला गेला आहे. पंजाबही धवनकडे कर्णधारपद सोपवण्याची शक्यत आहे. दुसरीकडे राजस्थान रॉयल्सने वरिष्ठ ऑफस्पिनर रविचंद्रन अश्विनसाठी मोठी बोली लावली. राजस्थानने दोन कोटी रुपयांच्या लिलावाच्या मूळ किमतीवरून अश्विनला खेळाडूला पाच कोटी रुपयांच्या यशस्वी बोलीनंतर संघात समाविष्ट केले गेले.







 


आयपीएलच्या कायम ठेवलेल्या खेळाडूंची यादी


चेन्नई सुपर किंग्ज : रवींद्र जडेजा (16 कोटी), एमएस धोनी (12 कोटी), मोईन अली (8 कोटी) आणि ऋतुराज गायकवाड (6 कोटी).


दिल्ली कॅपिटल्स : ऋषभ पंत (16 कोटी), अक्षर पटेल (9 कोटी), पृथ्वी शॉ (7.5 कोटी), एनरिक नोटार्जे (6.5 कोटी).


कोलकाता नाइट रायडर्स : आंद्रे रसेल (12 कोटी), व्यंकटेश अय्यर (8 कोटी), वरुण चक्रवर्ती (8 कोटी), सुनील नरेन (6 कोटी)


मुंबई इंडियन्स : रोहित शर्मा (16 कोटी), जसप्रीत बुमरार (12 कोटी), सूर्यकुमार यादव (8 कोटी), पोलार्ड (6 कोटी)


पंजाब किंग्स : मयंक अग्रवाल (14 कोटी), अर्शदीप सिंग (4 कोटी)


राजस्थान रॉयल्स : संजू सॅमसन (14 कोटी), जोस बटलर (10 कोटी, यशस्वी जैस्वाल (4 कोटी)


रॉयल चॅलेंजर्स बंगलोर : विराट कोहली (15 कोटी), ग्लेन मॅक्सवेल (11 कोटी), मोहम्मद सिराज (7 कोटी)


सनरायझर्स हैदराबाद : केन विल्यमसन (14 कोटी), उमरान मलिक (4 कोटी), अब्दुल समद (4 कोटी)


लखनौ सुपर जायंट्स : केएल राहुल (15 कोटी), स्टोइनिस (11 कोटी), रवी बिश्नोई (4 कोटी)


गुजरात टायटन्स : हार्दिक पंड्या (15 कोटी), शुभमन गिल (7 कोटी), रशीद खान (15 कोटी)


कोणत्या फ्रँचायझींकडे रक्कम किती?


पंजाब किंग्स : 72 कोटी रुपये


सनरायझर्स : 68 कोटी रुपये
राजस्थान रॉयल्स : 62 कोटी रुपये
आरसीबी : 57 कोटी रुपये
मुंबई : 48 कोटी रुपये
चेन्नई : 48 कोटी रुपये
कोलकाता : 48 कोटी रुपये
दिल्ली कॅपिटल्स : रु. 47.5 कोटी
लखनौ : 59.8 कोटी रुपये
अहमदाबाद : 52 कोटी रुपये


संबंधित बातम्या :



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha