IPL 2022 KKR vs MI : आयपीएलमध्ये (IPL 2022) आज मुंबई इंडियन्स (MI) आणि कोलकाता नाइट रायडर्स (KKR) यांच्यात लढत होणार आहे. यंदाच्या हंगामात मुंबई इंडियन्स (MI) च्या संघाला अद्याप आपलं खातंही उघडता आलेलं नाही. त्यामुळे आज मुंबईचा संघ कोलकाता (KKR) विरुद्ध पहिला विजय मिळवण्यासाठी मैदानात उतरेल. रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील मुंबईने आतापर्यंत आपले दोन्ही सामने गमावले आहेत. तर श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखालील कोलकाता सध्या चांगली कामगिरी करत आहे. कोलकाता आतापर्यंत तीनपैकी दोन सामने जिंकले आहेत. चांगले खेळाडू असूनही मुंबईला अद्याप यश मिळालेलं नाही.


कधी आणि कुठे होणार सामना ?
बुधवारी संध्याकाळी 7.30 वाजल्यापासून मुंबई इंडियन्स आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात सामना रंगणार आहे. हा सामना पुण्यातील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर होणार आहे.


लाइव्ह टेलिकास्ट कुठे पाहू शकता?
जर तुम्हाला मुंबई (MI) विरुद्ध कोलकाता (KKR) सामन्याचा आनंद घ्यायचा असेल तर तुम्ही स्टार स्पोर्ट्स नेटवर्कच्या चॅनेलवर त्याचे थेट प्रक्षेपण पाहू शकता.


कुठे पाहायता येणार सामन्याचं लाईव्ह स्ट्रीमिंग?
'डिस्नी प्लस हॉटस्टार'वर (Disney Plus Hotstar) कोलकाता नाईट रायडर्स आणि मुंबई इंडियन्स यांच्यातील सामन्याचा आनंद तुम्ही घेऊ शकता. याशिवाय तुम्ही लाईव्ह अपडेट्ससाठी आमच्या https://marathi.abplive.com या वेबसाइटशी कनेक्टेड रहा.


कोलकाता आणि मुंबईचे आधीचे रेकॉर्ड
आयपीएलमध्ये दोन्ही संघ 29 वेळा आमनेसामने आले आहेत. यामध्ये मुंबई इंडियन्सने 22 वेळा, तर कोलकाताने 7 सामने जिंकले आहेत. मागील विक्रमांच्या आधारे मुंबईचा वरचष्मा असला तरी यंदाच्या मोसमात मुंबईची आतापर्यंतची कामगिरी निराशाजनक आहे. तर कोलकाताचा संघ सध्या चांगल्या फॉर्ममध्ये आहे.


महत्त्वाच्या बातम्या :



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha