Sangli : पत्नीकडून पतीवर विषप्रयोग झाल्याची धक्कादायक घटना सांगलीतील वाळवा तालुक्यात घडली आहे. जेवण, चहामध्ये फिनेल आणि गुलाबजाममध्ये उंदीर मारण्याचं औषध घालून पतीला जीवे मारण्याचा पत्नीकडून प्रयत्न झाल्याची घटना घडली आहे. गुलाबजामनला बुरशी आल्याने आणि त्यामध्ये उंदीर मारण्याचे औषधांचे तुकडे आढळून आल्याने हा प्रकार उघडकीस आला. पत्नीने पतीस गुलाबजामुन खाण्यासाठी अधिक आग्रह केला होता. पत्नीने बनवलेल्या गुलाबजामला बुरशी आल्याने पतीला संशय आला. हा प्रकार समोर आल्यानंतर पतीने इस्लामपूर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली. यानंतर पोलिसांनी आरोपी महिलेला अटक केली आहे.


वाळवा तालुक्यातील पेठ येथे नवविवाहित पत्नीनेच पतीला अन्नातून विषप्रयोग करून त्याच्या खुनाचा प्रयत्न केल्याची घटना सोमवारी उघडकीस आली आहे .जेवण, चहामध्ये फिनेल आणि  गुलाबजाममध्ये उंदीर मारण्याचे औषध घालून पतीला जीवे मारण्याचा प्रयत्न करणाऱ्या महिलेस पोलिसांनी अटक केली आहे. न्यायालयाने तिला दोन दिवस पोलीस कोठडी देण्याचे आदेश दिला आहे. याबाबत प्रसन्न शिवप्रसाद खंकाळे (वय ३०, रा. पेठ) यांनी पोलिसात फिर्याद दिली होती. त्यानुसार गौरी प्रसन्न खंकाळे हिच्याविरुद्ध पतीच्या खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे. प्रसन्न आणि गौरीचे डिसेंबर 2021 मध्ये लग्न झालं. एका महिन्याच्या कालावधीत व्यवस्थित संसार केल्यानंतर गौरीने प्रसन्नच्या आईशी वाद घालायला सुरुवात केली. त्यावर नवीन लग्न असल्यामुळे तिला सर्वांनी समजून घेतले. 


फेब्रुवारी महिन्यात गौरी गर्भवती राहिली. त्यानंतर 17 मार्च आणि 21 मार्च रोजी गौरीने प्रसन्नच्या जेवणाचा डबा आणि चहामधून फिनेल घालून त्याच्यावर विषप्रयोगाचा प्रयत्न केला. त्यानंतर 4 एप्रिल रोजी गौरीने प्रसन्नला गुलाबजाम खायला दिले. मात्र गुलाबजाम खाण्यास प्रसन्नने त्यावेळी त्याने नकार दिला. गौरीने जास्त आग्रह केल्याने त्याला संशय आला. त्याने गुलाबजाम चिरून पाहिले असता त्यामध्ये बुरशी आल्यासारखे आणि उंदिर मारण्याच्या औषधाचे तुकडे असल्याचे त्याला आढळले. गौरी आपल्याला जीवे मारण्याचा प्रयत्न करत असल्याचा संशय बळावल्याने प्रसन्नने तिच्याविरोधात पोलिसात फिर्याद दाखल केली.


महत्त्वाच्या बातम्या :



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha