LSG vs MI: आयपीएलच्या 37 व्या सामन्यात लखनौ सुपर जायंट्स आणि मुंबई इंडियन्स (Lucknow Super Giants vs Mumbai Indians) आमने-सामने येणार आहेत. या हंगामात दोन्ही संघ दुसऱ्यांदा एकमेकांशी भिडणार आहे. मागच्या लढतीत लखनौच्या संघानं मुंबईला पराभूत केलं होतं. केएल राहुलच्या नेतृत्वात लखनौच्या संघानं दमदार कामगिरी करून दाखवली. तर, यंदाचा हंगाम मुंबईच्या संघासाठी चांगला ठरलेला नाही. त्यांनी 


या हंगामात लखनौच्या संघानं चार सामने जिंकले आहेत. तर, मुंबईचा संघ या हंगमातील आपल्या पहिल्या विजयाच्या शोधात आहेत. मुंबईच्या संघानं आतापर्यंत सात सामने खेळले आहेत. हे सर्व सामन्यात मुंबईला पराभव पत्कारावा लागला. आयपीएलच्या गुणतालिकेत लखनौचा संघ 8 गुणांसह पाचव्या क्रमांकावर आहेत. तर, मुंबईचा संघ गुणतालिकेच्या तळाशी आहे. 


अर्जून तेंडुलकरला पदार्पणाची संधी मिळणार?
लखनौ आणि मुंबई यांच्यात होणारा सामना वानखेडे स्टेडियमवर खेळला जाणार आहे. या सामन्यात मास्टर ब्लास्टर सचिन तेंडूलकर यांचा मुलगा अर्जून तेंडूलकरला संधी मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. सचिन तेंडूलकर यांचा आज वाढदिवस आहे. आजच्या सामन्यात विजय मिळवून मुंबईचा संघ सचिन तेंडूलकरला त्यांच्या वाढदिवसाचं गिफ्ट देण्याचा प्रयत्न करेल.


लखनौचा संभाव्य संघ-
केएल राहुल (कर्णधार), क्विंटन डी कॉक (विकेटकीपर), मनीष पांडे, मार्कस स्टॉयनिस, दीपक हुडा, आयुष बडोनी, क्रुणाल पांड्या, जेसन होल्डर, दुष्मंथा चमीरा, आवेश खान, रवी बिश्नोई.


मुंबईचा संभाव्य संघ-
रोहित शर्मा (कर्णधार), इशान किशन (विकेटकीपर), डेवाल्ड ब्रेविस, सूर्यकुमार यादव, तिळक वर्मा, कायरन पोलार्ड, डॅनियल सॅम्स, हृतिक शॉकीन, रायले मेरेडिथ, जयदेव उनादकट, जसप्रीत बुमराह.


हे देखील वाचा-