SRH vs CSK : यंदाच्या आयपीएलमधील (IPL 2022) 46 व्या सामन्यात सनरायजर्स हैदराबाद आणि चेन्नई सुपर किंग्स (SRH vs CSK) हे दोन्ही संघ आमने-सामने असणार आहेत. आजचा हा सामना पुण्याच्या एमसीए मैदानात पार पडणार आहे. धोनी पुन्हा एकदा चेन्नईचा कर्णधार झाला असू दोन्ही संघात आज काही बदल होऊ शकतात.
यंदाच्या आयपीएलमध्ये दिल्लीने 8 पैकी 5 सामने जिंकत 10 गुण मिळवले आहेत. त्यामुळे ते चौथ्या स्थानी आहेत. तर दुसरीकडे चेन्नई 8 पैकी केवळ 2 सामने जिंकत 4 गुणांसह नवव्या स्थानी आहे. दरम्यान आजवर चेन्नई हैदराबादवर भारी पडली असली तरी यंदा हैदराबादचा फॉर्म चांगला असल्याने आजचा सामना चुरशीचा होऊ शकतो. तर आजच्या सामन्यापूर्वी दोन्ही संघाच्या आजवरच्या इतिहासावर एक नजर फिरवूया...
चेन्नई विरुद्ध हैदराबाद Head to Head
आयपीएलमध्ये आजवर सनरायजर्स हैदराबाद आणि चेन्नई सुपर किंग्स (SRH vs CSK) हे संघ 17 वेळा एकमेंकाविरुद्ध मैदानात उतरले आहेत. या सर्व सामन्यांचा विचार करता चेन्नईचं पारडं कमालीचं जड राहिलं आहे. त्यांनी 12 सामन्यात विजय मिळवला आहे. तर हैदराबादने 5 सामने जिंकण्यात यश मिळवलं आहे.
आजच्या सामन्यात अशी असू शकते संभाव्य अंतिम 11
चेन्नई - रॉबिन उथप्पा, ऋतुराज गायकवाड, मोईन अली, अंबाती रायडू, शिवम दुबे, रविन्द्र जडेजा, एमएस धोनी (कर्णधार आणि विकेटकीपर), ड्वेन प्रीटोरियस, ड्वेन ब्रॉवो, महेश चौधरी, महेश तीक्ष्णा
हैदराबाद - केन विलियमसन (कर्णधार), अभिषेक शर्मा, राहुल त्रिपाठी, एडन मारक्रम, निकोलस पूरन, शशांक सिंह, वॉशिंगटन सुंदर, भुवनेश्वर कुमार, टी. नटराजन, मार्को जानसेन, उमरान मलिक