Sharapova and Schumacher : गुरुग्राम पोलिसांनी माजी रशियन टेनिस स्टार मारिया शारापोव्हा (Maria Sharapova) माजी फॉर्म्युला वन रेसर मायकेल शूमाकर (Michael Schumacher) यांच्यासह 11 जणांविरुद्ध फसवणूक आणि गुन्हेगारी कट रचल्याचा गुन्हा दाखल केला आहे. न्यायालयाच्या आदेशानुसार, दिल्लीतील एका महिलेच्या तक्रारीवरून बादशाहपूर पोलीस ठाण्यात हा एफआयआर दाखल करण्यात आला आहे. या सर्वांवर फसवणुकीचा आरोप महिलेने केला आहे.


नेमकं काय प्रकरण आहे ?


नवी दिल्लीतील छतरपूर मिनी फार्ममध्ये राहणाऱ्या शेफाली अग्रवालने तक्रार केली आहे की, तिने शारापोवा नावाच्या प्रोजेक्टमध्ये अपार्टमेंट बुक केले होते. या प्रकल्पात एका टॉवरला शूमाकरचे नाव देण्यात आले. 2016 पर्यंत हा प्रकल्प पूर्ण करण्याचा दावा बिल्डरने केला होता. मात्र, त्याचे काम अजून पूर्ण झालेले नाही. या प्रोजेक्‍टमध्‍ये सामील होण्‍याची जाहिरात करून ही आंतरराष्‍ट्रीय सेलिब्रिटी या फसवणुकीत सहभागी झाल्याचे महिलेचे म्हणणे आहे.  


महिलेने कोर्टात काय सांगितले ?


यापूर्वी, या महिलेने मेसर्स रियलटेक डेव्हलपमेंट अँड इन्फ्रास्ट्रक्चर (इंडिया) प्रायव्हेट लिमिटेड आणि इतर विकासक शारापोव्हा आणि शूमाकर यांना 80 लाख रुपयांची फसवणूक केल्याच्या आरोपाखाली गुरुग्राम न्यायालयात खेचले होते. महिलेने कोर्टात सांगितले की, तिने आणि तिच्या पतीने गुरुग्रामच्या सेक्टर 73 मधील शारापोवा नावाच्या टॉवरमध्ये अपार्टमेंट बुक केले होते. परंतु, विकासक कंपन्यांनी पैसे घेऊनही घर दिले नाही.


शारापोवाची घटनास्थळाला भेट


या प्रकल्पाबाबत आम्ही जाहिरातींमध्ये पाहिले असल्याचे महिलेने तक्रारीत म्हटले आहे. त्यात शारापोवा आणि शूमाकरसारख्या सेलिब्रिटींचा समावेश असल्याचा दावा करण्यात आला होता. बिल्डरने अनेक आश्वासने दिली होती. शारापोव्हा आणि शुमाकर यांचाही या प्रकल्पात प्रवर्तक म्हणून सहभाग होता. अशा स्थितीत त्यांनी ही फसवणूकही केली आहे. शेफालीने सांगितले की, शारापोव्हानेही घटनास्थळाला भेट दिली होती आणि टेनिस अकादमी आणि स्पोर्ट्स स्टोअर उघडण्याचे आश्वासन दिले होते. शारापोव्हा या प्रकल्पाची जाहिरात करत असल्याचे बिल्डरच्या माहितीपत्रकात लिहिले होते.


या प्रकरणाची पाहणी सुरू आहे


बादशाहपूर पोलिस स्टेशनचे एसएचओ इन्स्पेक्टर दिनकर सांगतात की, या सर्वांविरुद्ध आयपीसीच्या कलम 34,120-बी (गुन्हेगारी कट), 406 (गुन्हेगारी विश्वासभंग) आणि 420 (फसवणूक) अंतर्गत एफआयआर नोंदविण्यात आला आहे. या प्रकरणाची चौकशी सुरु आहे. 


महत्वाच्या बातम्या :



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha