TATA IPL 2022: भारतातील सर्वात लोकप्रिय लीग आयपीएलच्या पंधराव्या हंगामाचा बिगुल वाजलाय. या हंगामातील पहिला सामना चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात येत्या 26 मार्चला खेळला जाणार आहे. तर, मागील हंगामात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या दिल्ली कॅपिटल्सचा संघ त्यांच्या पहिल्या सामन्यात मुंबई इंडियन्सशी भिडणार आहे. तर, डेव्हिड वार्नरसोबत कोणता खेळाडू सलामी देणार आणि दिल्लीचा संभाव्य प्लेईंग इलेव्हन कसा असेल? यावर एक नजर टाकुयात.
डेव्हिड वॉर्नरसोबत कोण सलामी देणार?
ऑस्ट्रेलियाचा स्फोटक फलंदाज डेव्हिड वॉर्नर याच्यासोबत भारताचा युवा फलंदाज पृथ्वी शॉ सलामी देईल, असं जवळपास निश्चित मानलं जात होतं. परंतु, पृथ्वी शॉ यो यो चाचणीत अपात्र ठरलाय. ज्यामुळं यंदाच्या हंगामात डेव्हिड वार्नरसोबत ऑस्ट्रेलियाचा तडाखेबाज फलंदाज मिचेश मार्श डावाची सुरुवात करताना दिसू शकतो.
दिल्लीचा मध्य क्रम कसा असू शकतो?
दिल्लीचा कर्णधार ऋषभ पंत चौथ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी सज्ज आहे. यानंतर वेस्ट इंडिजचा रोव्हमन पॉवेल आणि सरफराज खान फिनिशरची भूमिका निभावतील. रोव्हमन पॉवेलनं अलीकडेच भारताविरुद्धच्या टी-20 मालिकेत चमकदार कामगिरी केली होती.
दिल्लीचे गोलंदाज
दिल्लीच्या संघात अक्षर पटेल आणि कुलदीप यादव या दोन फिरकीपटूंवर मोठी जबाबदारी असेल. त्याचबरोबर वेगवान गोलंदाजीची जबाबदारी शार्दुल ठाकूर, चेतन साकारिया आणि एनरिक नॉर्टजे यांच्या खांद्यावर सोपवण्यात येईल, अशी अपेक्षा केली जात आहे.
दिल्ली कॅपिटल्ससाठी संभाव्य प्लेइंग इलेव्हन-
डेव्हिड वॉर्नर, पृथ्वी शॉ, मिचेल मार्श, ऋषभ पंत (कर्णधार आणि यष्टिरक्षक), सरफराज खान, रोवमन पॉवेल, अक्षर पटेल, शार्दुल ठाकूर, चेतन साकारिया, कुलदीप यादव आणि अॅनरिक नॉर्टजे.
दिल्ली कॅपिटल्सचा संघ-
ऋषभ पंत (16 कोटी), अक्षर पटेल (9 कोटी), पृथ्वी शॉ (7.5 कोटी), एनरिच नॉकिया (6.5कोटी), डेव्हिड वॉर्नर (6.25 कोटी), मिचेल मार्श (6.5 कोटी), शार्दूल ठाकूर (10.75 कोटी), मुस्ताफिजूर रेहमान (2 कोटी), कुलदीप यादव (2 कोटी), अश्विन हेब्बर (20 लाख), सरफराझ खान (20 लाख), कमलेश नागरकोटी (1.10 कोटी), केएस भरत (2 कोटी), मनदीपसिंग (1.10 कोटी), खलिल अहमद (5.25 कोटी), चेतन साकरिया (4.20 कोटी), ललित यादव (65 लाख), रिपल पटेल (20 लाख), यश धुल (50 लाख), रोवमन पॉवेल (2.80 कोटी), प्रवीण दुबे (50 लाख)
हे देखील वाचा-
- IPL 2022 पूर्वी ग्लेन मॅक्सवेलचं विराट कोहलीबद्दल मोठं वक्तव्य, म्हणाला...
- IPL 2022 : ...म्हणून धोनी घालतो 'नंबर 7'ची जर्सी; माहीनं स्वतः सांगितलं कारण
- Sharapova and Schumacher : टेनिस स्टार शारापोवा आणि फॉर्म्युला वन रेसर शूमाकर यांच्यावर गुरुग्राममध्ये फसवणुकीचा गुन्हा दाखल
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha