IPL 2022, RCB : आयपीएलच्या 15 व्या हंगामात आरसीबीने (Royal Challengers Bangalore) दणक्यात सुरुवात केली आहे. दहा गुणांसह आरसीबीचा संघ गुणतालिकेत (ipl points table 2022) दुसऱ्या क्रमांकावर आहे. आयपीएलच्या विजेतेपदासाठी आरसीबीला यंदा दावेदार मानले जात आहे. त्याला कारणही तसेच आहे. आरसीबीकडे एकापेक्षा एक मोठे मॅचविनर खेळाडू आहे. पण हा संघ कोणत्या एका खेळाडूवर अवलंबून नाही. विराट कोहली, मॅक्सवेल यांना आपल्या लौकिकास साजेशी कामगिरी करता आलेली नाही. पण याचा आरसीबीच्या कामगिरीवर कोणताही परिणाम झालेला नाही. आरसीबीची गोलंदाजी आणि फलंदाजी जमेची बाजू असल्याचे दिसत आहे. 


फलंदाजीत कार्तिकमुळे आरसीबीची ताकद वाढलेली दिसत आहे. पण कर्णधार फाफसाठी कार्तिक नव्हे तर ऑस्ट्रेलिचा वेगवान गोलंदाज जोश हेलजवूड तुरुप का एक्का ठरत आहे. होय... तीन सामन्यात हेजलवूडने दमदार कामगिरी केली. हेजलवूडमध्ये आरसीबीची गोलंदाजी मजबूत दिसत आहे. हेजलवूड प्रत्येक सातव्या चेंडूवर विकेट घेत आहे. तीन सामन्यात हेजलवूडने आठ विकेट घेतल्या आहे. इतकेच नव्हे तर धावांच्या बाबतीतही हेजलवूड कंजूष राहिलाय. 


जोश हेजलवूडने पॉवरप्लेमध्ये शानदार गोलंदाजी केली आहे. त्याशिवाय डेथ ओव्हरमध्येही तो आपला जलवा दाखलत आहे. नुकत्याच झालेल्या लखनौविरोधातील सामन्यात हेजलवूडने चार विकेट घेतल्या होत्या. तर दिल्लीविरोधात झालेल्या सामन्यात हेजलवूडने तीन विकेट घेतल्या होत्या. आतापर्यंत हेजलवूडने दमदार कामगिरी केली आहे. हेजलवूडच्या आगमनामुळे आरसीबीची गोलंदाजी मजबूत झाली. हेजलवूड प्रत्येक सातव्या चेंडूवर विकेट घेतोय. 


हे देखील वाचा-