IPL 2022 : आयपीएल (IPL 2022) म्हणजे चौकार-षटकारांचा पाऊस. टी20 क्रिकेट म्हणजेच मोठ्या प्रमाणात चौकार-षटकार पडणार यात शंका नसते. त्यात आयपीएल म्हटलं की जगातील अव्वल दर्जाचे खेळाडू असल्याने ही षटकार-चौकारांची बरसात आणखी वाढते. दरम्यान यंदाची आयपीएल (IPL 2022) सुरु असून चौकार-षटकारांचा पाऊस पडतच आहे. विशेष म्हणजे आयपीएल महालिलावात कोट्यवधींना खरेदी करण्यात आलेल्या गोलंदाजांनाच सर्वाधिक चौकार-षटकार पडत आहेत. दरम्यान आतापर्यंत सर्वाधिक षटकार हे बंगळुरुच्या वानिंदू हसरंगाच्या षटकात पडले असून सर्वाधिर चौकार लखनौच्या आवेश खानला खावे लागले आहेत. 


सर्वाधिक षटकार खाणारे गोलंदाज


श्रीलंका संघाचा स्टार ऑलराउंडर वानिंदु हसरंगा यंदा IPL मेगाऑक्शनमध्ये 10.75 कोटी रुपये घेत बंगळुरु संघात सामिल झाला. इतका महाग खेळाडू असून त्याला आतापर्यंतच्या आयपीएल 2022 मध्ये तब्बल 17 षटकार लगावले आहेत. यानंतर दुसऱ्या क्रमांकावर  मोहम्मद सिराज आणि ओडिन स्मिथ आहे. मोहम्मद सिराजला RCB ने 7 कोटींना रिटेन केलं. तर ओडिन स्मिथला पंजाब किंग्सने 6 कोटीला खरेदी केलं. या दोघांच्या ओव्हरमध्ये आतापर्यंत प्रत्येकी 16 षटकार पडले आहेत. त्यानंतर आकाशदीप, वरुण चक्रवर्तीला प्रत्येकी 14 तर पॅट कमिन्सला 11 षटकार लागले आहेत.


चौकार खाण्यात हे गोलंदाज आहेत टॉपवर


भारताचा युवा वेगवान गोलंदाज आवेश खानला यंदा लखनौ सुपरजायंट्सने IPL मेगा ऑक्शनमध्ये 10 कोटी रुपयांना खरेदी केलं होतं.  पण आता त्याच्याच ओव्हरमध्ये सर्वाधिक चौकार लागले आहेत. आवेशच्या षटकात आतापर्यंत तब्बल 27 चौकार लागले आहेत. आवेशनंतर प्रसिध कृष्णाचा नंबर लागतो. त्याने 26 चौकार खालले आहेत. तिसऱ्या नंबरवर मोहम्मद सिराज, उम्रान मलिक, टायमल मिल्स, मोहम्मद शमी आणि रवी बिश्नोई असून त्यांना प्रत्येकी 22 चौकार लगावले आहेत. 


हे देखील वाचा-