Mitchell Marsh Covid Positive:  दिल्ली कॅपिटल्सचा (Delhi Capitals) ऑलराऊंडर मिशेल मार्शची (Mitchell Marsh) कोरोना चाचणी पॉझिटिव्ह (Coronavirus Positive) आल्याची माहिती समोर आली आहे. त्याला उपचारासाठी रुग्णालयात पाठवण्यात आलं आहे. त्याच्याव्यतिरिक्त दिल्ली कॅपिटल्सच्या हॉटेल स्टाफचे तीन सदस्य, एक डॉक्टर आणि सोशल मीडिया टीमच्या सदस्याला कोरोनाचा संसर्ग झाल्याचं समजत आहे. 


 दिल्ली कॅपिटल्सला त्यांचा पुढील सामना येत्या बुधवारी पंजाब किंग्जविरुद्ध खेळायचा आहे. हा सामना पुण्यातील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर होणार आहे. त्यासाठी दिल्लीचा संघ आज मुंबईहून पुण्याला रवाना होणार होता. पीटीआय या वृत्तसंस्थेचा हवाला देऊन सामना नियोजित वेळेवर होणार असल्याचं सांगितलं जात होतं. परंतु, दिल्लीच्या संघात कोरोनाचा शिरकाव झाल्यानंतर पुन्हा एकदा या सामन्याच्या आयोजनावर प्रश्न उपस्थित केले जात आहे.


एएनआयचं ट्वीट-



मागील वर्षी अर्थात 2021 मध्ये कोरोना महामारीमुळे आयपीएल 2021 चा हंगाम 4 मे 2021 रोजी अर्ध्यातूनच थांबवावा लागला होती. त्यानंतर उर्वरित आयपीएल सामने दुबईमध्ये घेण्यात आले होते. 2021 मध्ये सनराइजर्स हैदराबादचा विकेटकीपर ऋद्धिमान साहा आणि दिल्ली कॅपिटल्सचा फिरकीपटू अमित मिश्रा यांना कोरोनाचा संसर्ग झाला होता. त्यानंतर आयपीएलचे सामने स्थगित कऱण्यात आले होते. 2021 मध्ये 29 लीग सामने झाल्यानंतर बायो बबलमध्ये कोरोनाचा शिरकाव झाला होता. त्यानंतर बीसीसीआयने उर्वरित सामने दुबईमध्ये खेळवले होते.  तर, कोरोना महामारीमध्ये 2020 चा हंगामही दुबईत झाला होता.  


हे देखील वाचा-