SRH vs PBKS : आज आयपीएल (IPL 2022) 2022 मधील शेवटचा साखळी सामना पार पडणार आहे. सनरायजर्स हैदराबाद आणि पंजाब किंग्स (SRH vs PBKS) हे दोन्ही संघ आज आमने-सामने असणार आहेत. दोन्ही संघाचे प्लेऑफमधील आव्हान आधीच संपुष्टात आले असून प्लेऑफचे चारही संघ मिळाल्याने आजचा हा सामना औपचारीक असणार आहे. पण दोन्ही संघाला आपआपला यंदाच्या हंगामातील शेवटचा सामना जिंकून शेवट गोड करायचा असल्याने दोघेही आज प्रयत्नांची शिकस्त करतील.
पंजाब किंग्जविरुद्ध टॉस जिंकून हैदराबादच्या संघान प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. मुंबईच्या वानखेडे मैदानात हा सामना खेळला जाणार आहे. आजच्या सामन्यासाठी दोन्ही संघाच्या अंतिम 11 चा विचार करता पंजाब किंग्सचा कर्णधार मयांक अगरवाल याने तीन बदल संघात केले आहेत. नथान एलिस भानुपक्षाच्या जागी संघात असेल. तर शाहरुख आणि प्रेरक मंकड राहुल चाहर आणि रिषी धवनची जागा घेतील. तर हैदराबादने रोमारियो शेफार्ड आणि जगदीश सुचित यांना संधी दिली आहे. तर नेमके कोणते खेळाडू खेळणार आहेत यावर एक नजर फिरवूया
हैदराबाद अंतिम 11
अभिषेक शर्मा, प्रियम गर्ग, राहुल त्रिपाठी, एडन मार्कराम, निकोलस पूरन (विकेटकिपर), रोमारियो शेफर्ड, वॉशिंग्टन सुंदर, जगदीश सुचित, भुवनेश्वर कुमार (कर्णधार), फजलहक फारूकी, उमरान मलिक.
पंजाब अंतिम 11
जॉनी बेअरस्टो, शिखर धवन, लियाम लिव्हिंगस्टोन, मयंक अग्रवाल (कर्णधार), शाहरुख खान, जितेश शर्मा (विकेटकिपर), हरप्रीत ब्रार, नॅथन एलिस, प्रेरक मंकड, कागिसो रबाडा, अर्शदीप सिंह.
हे ही वाचा -