RCB in Playoffs : वानखेडे मैदानावर शनिवारी झालेल्या सामन्यात मुंबईने दिल्लीचा पराभव करत आरसीबीला प्लेऑफमध्ये पोहचवले. मुंबईने सामना जिंकल्यानंतर आरसीबीच्या खेळाडूनं जंगी सेलिब्रेशन केले.. त्यांचा उत्साह पाहण्याजोगा होता.. आरसीबीने आपल्या अधिकृत ट्विटरवर आरसीबीच्या खेळाडूचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत. 


आरसीबीच्या खेळाडूंनी टीम डेविड नावाच्या घोषणाही दिल्या. दिल्लीच्या पराभवामुळे आरसीबीचे प्लेऑफचं तिकीट पक्कं झालेय. आरसीबीचा संघ आता प्लेऑफमध्ये पोहचलाय. आरसीबीच्या अधिकृत ट्विटरवर व्हिडीओ आणि फोटो फोटो पोस्ट करण्यात आले आहेत. यामध्ये कर्णधार फाफ डु प्लेसिस, विराट कोहलीसह आरसीबीचा प्रत्येक खेळाडू मुंबईच्या विजयाचे सेलिब्रेशन करत होता. 


पाहा आरसीबीचे ट्वीट 














विराट कोहलीने केलं ट्वीट 
आरसीबीचा माजी कर्णधार विराट कोहलीने मुंबईच्या विजयानंतर एक ट्विट केले आहे. ज्यामध्ये त्याने कोलकाता लिहिले आणि फ्लाइटची इमोजी टाकली. यानंतर, पुढच्या ओळीत, त्याने मुंबई इंडियन्स आणि बंगळुरु संघाला टॅग करत हँडशेक इमोजी पोस्ट केला. वास्तविक, बेंगळुरु संघ आता 25 मे रोजी कोलकाता येथील ईडन गार्डन्स स्टेडियमवर एलिमिनेटर सामन्यात लखनऊ सुपर जायंट्सशी भिडणार आहे.