IPL 2022 closing ceremony : आयपीएलचा 15 वा (IPL 2022) हंगाम आता जवळपास संपत आला आहे. 70 पैकी 57 लीग सामने खेळले गेले असून उर्वरीत सामन्यानंतर प्लेऑफ आणि सेमीफायलनसह-फायनल सामने पार पडणार आहेत. दरम्यान आयपीएलचा अंतिम सामना 29 मे रोजी अहमदाबादच्या (Ahmedabad) नरेंद्र मोदी स्टेडियमवर (Narendra Modi Stadium) पार पडणार आहे. यावेळी एक दमदार कार्यक्रमाचं आयोजन (IPL 2022 closing ceremony) करण्यात येणार असून अनेक तारे-तारका यावेळी त्याठिकाणी अवतरतील. यामध्ये सुपरस्टार रणवीर सिंहसह (Ranveer Singh) संगीतकार ए.आर. रहमान (AR Rehman) तसचं क्रिकेट जगतातील मोठमोठ्या हस्तींचा समावेश असणार आहे.


अहमदाबादच्या मैदानात अंतिम सामना खेळवला जाणार असून या सामन्यापूर्वी सांगता कार्यक्रम पार पडेल. सूत्रांच्या माहितीनुसार हा सांगता कार्यक्रम अर्थात क्लोजिंग सेरेमनी 45 मिनिटं चालेल. यासाठी बीसीसीआयने एका एजेन्सीला जबाबदारी सोपवली आहे. सांगता समारंभाच्या दरम्यान भारतीय क्रिकेटचा एक संपूर्ण प्रवास यावेळी दाखवला जाईल.


विशेष कार्यक्रमाचं आयोजन


बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली यांनी एका वेबसाईटला दिलेल्या माहितीत लिहिलं आहे की,"या कार्यक्रमात भारताच्या स्वातंत्र्याची 75 वर्षे पूर्ण होण्याच्या औचित्याने एक खास प्रकारचं सेलिब्रेशन आयोजित केलं जाईल. भारतीय क्रिकेटने मागील 7 दशकात जे काही मिळवलं त्या प्रवासावर एक नजर यावेळी टाकली जाईल. त्यामुळे फायनल सामन्यापूर्वी भारतीय क्रिकेटचा प्रवास पाहत भारताच्या स्वांतत्र्याची 75 वर्षे यावेळी सेलिब्रेट केली जातील."


2018 मध्ये झालं होतं अखेरचं आयोजन


आयपीएलचा यंदाचा 15 वा हंगाम आहे. दरवर्षी आय़पीएलची सुरुवात तसंच सांगता दणक्यात पार पडत असते. पण मागील काही वर्षे कोरोनाच्या संकटामुळे आयपीएलमध्ये असे कार्यक्रम होत नव्हते. अखेर 2018 मध्ये एक दमदार सांगता कार्यक्रम झाला होता. त्यानंतर आता यंदा एक मोठ्या समारंभाचे आयोजन होणार आहे. यंदाच्या आयोजनावेळी बीसीसीआय (BCCI) भारताच्या स्वातंत्र्याच्या 75 वर्षाच्या उत्सवाचा अनोखं सेलिब्रेशन करणार आहेत. मागील काही वर्षात आयोजन झालं नसल्याने यंदा एक दमदार कार्यक्रम बीसीसीआय आयोजित कऱणार आहे.


हे देखील वाचा-