IPL 2022 RR vs DC, Pitch Report : आयपीएलमध्ये (IPL 2022) आज राजस्थान रॉयल्स आणि दिल्ली कॅपिटल्स (RR vs DC) या दोन्ही संघात सामना पार पडणार आहे. प्लेऑफमध्ये पोहोचण्यासाठी दोन्ही संघासाठी महत्त्वाचा असणाऱ्या आजच्या सामन्याकडे अनेकांचे लक्ष लागून आहे. गुणतालिकेचा विचार करता राजस्थानचा संघ गुणतालिकेत तिसऱ्या स्थानी आहे. त्यांनी 11 पैकी 7 सामने जिंकत 14 गुण मिळवले आहेत. त्यांचा रनरेटही चांगला असल्याने ते तिसऱ्या स्थानावर आहेत. तर दिल्लीचा संघ 11 पैकी 5 सामनेच जिंकल्याने 10 गुणांसह पाचव्या स्थानी आहे.
याशिवाय आयपीएलमध्ये आजवर राजस्थान आणि दिल्ली 25 वेळा एकमेंकाविरुद्ध मैदानात उतरले आहेत. या सर्व सामन्यांचा विचार करता दोन्ही संघानी अगदी चुरशीची टक्कर एकमेकांना दिली आहे. यात राजस्थाननं केवळ एक सामना अधिक जिंकत 13 विजय मिळवले आहेत. तर दिल्लीने 12 सामन्यात विजय मिळवला आहे. आता पर्यंत दोन्ही संघाची एकमेंकाविरुद्धची कामगिरी अत्यंत अटीतटीची असल्यामुळे आजचा सामनाही चुरशीचा होण्याची शक्यता आहे. दरम्यान आतापर्यंतच्या सामन्यांत खेळाडूंच्या फॉर्मचा विचार करता कोणत्या 11 (Probable 11) खेळाडूंकडे सर्वांचे लक्ष असेल ते पाहूया...
राजस्थान विरुद्ध दिल्ली अशी असेल ड्रीम 11 (RR vs DC Best Dream 11)
विकेटकीपर- ऋषभ पंत, संजू सॅमसन, जोस बटलर
फलंदाज- डेव्हिड वॉर्नर, रोवमेन पोवेल, यशस्वी जैस्वाल
ऑलराउंडर- मिचेल मार्श
गोलंदाज- युजवेंद्र चहल, खलील अहमद, प्रसिध कृष्णा
कसा आहे पिच रिपोर्ट?
आजचा सामना नवी मुंबईच्या डी.वाय. पाटील मैदानावर होणार आहे. या मैदानावर मागील सामन्यात मुंबईच्या बुमराहने 5 विकेट्स घेत इतिहास रचला. तर त्यानंतर त्या सामन्यातच केकेआरने मुंबईला अवघ्या 113 धावात ऑलआऊट केलं. त्यामुळे याठिकाणी वेगवान गोलंदाजांना मदत मिळत असल्याने सामना चुरशीचा होऊ शकतो. सामना सायंकाळी असल्यान दुसऱ्या डावात दव पडण्याची शक्यता आहे, पण मागील सामन्याचं पाहता आज नाणेफेक जिंकणारा नेमका कोणता निर्णय घेईल हे नाणेफेकीनंतरच स्पष्ट होईल.
हे देखील वाचा-