MI vs PBKS : आयपीएलमधील 2022 (IPL 2022) मधील आजच्या 23 व्या सामन्यात मुंबई इंडियन्स विरुद्ध पंजाब किंग्स (MI vs PBKS) यांच्यात पार पडत आहे. सामन्यात नुकतीच नाणेफेक झाली असून मुंबई इंडियन्सने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे पंजाबला आधी फलंदाजी करावी लागणार आहे. स्पर्धेत आतापर्यंत एकही सामना न जिंकलेल्या मुंबईने आज नाणेफेक जिंकल्याने त्यांच्यासाठी सामना जिंकण्याची सुवर्णसंधी आहे. स्पर्धेतील आजचा हा सामना पुण्यातील एमसीए स्टेडियमवर पार पडणार आहे.
यंदाच्या हंगामात मुंबईने चार पैकी चार सामने गमावले आहेत. त्यामुळे त्यांना दुसरीकडे आरसीबी मात्र कमाल फॉर्ममध्ये असून त्यांनी चार पैकी तीन सामने जिंकले आहेत. त्यामुळे आज मुंबई विजयाचं खातं उघडणार की पंजाब त्यांना मात देणार? याकडे सर्वांचे लक्ष आहे. मुंबईने रमनदीपजागी पुन्हा एकदा टायमल मिल्सला संघात घेतलं आहे. तर पंजाबने संघात एकही बदल न केल्याचंही समोर आलं आहे. तर नेमके अंतिम 11 खेळाडू कोण आहेत ते पाहूया...
मुंबई अंतिम 11
रोहित शर्मा (कर्णधार), ईशान किशन (विकेटकिपर), सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, किरॉन पोलार्ड, डेवाल्ड ब्रेव्ह्यूस, जयदेव उनाडकट, मुरुगन आश्विन, जसप्रीत बुमराह, टायमल मिल्स, बेसिल थम्पी.
पंजाब अंतिम 11
मयांक अगरवाल (कर्णधार), शिखर धवन, लियाम लिव्हिंगस्टोन, जॉनी बेअरस्टोव्ह (विकेटकीपर), शाहरुख खान, ओडियन स्मिथ, जितेश शर्मा, अर्शदीप सिंग, कागिसो रबाडा, वैभव अरोरा, राहुल चाहर
- Hardik Pandya : या पठ्यानं थेट हार्दिक पंड्यालाच केलं चँलेज; आता नोकरी गमवावी लागणार का? जाणून घ्या नेमकं प्रकरण
- IPL 2022 : 'तू जाने ना...' बॉलिवूड गाण्यांमध्ये रमला निकोलस पूरन; SRH ने शेअर केलेला व्हिडीओ पाहाच
- Sunil Gavaskar : 'आम्ही अजूनही कोहिनूर हिऱ्याची वाट पाहतोय', आयपीएल कॉमेन्ट्री दरम्यान गावस्करांचा टोला