RCB vs CSK : मंगळवारच्या सामन्यात चेन्नई सुपरकिंग्सनी रॉयल चँलेजर्स बंगळुरु संघाला 23 धावांनी मात दिली. बंगळुरु संघाचा आज पराभव झाला असला तरी सामन्यातील एका खास गोष्टींनी सर्वच क्रिकेट चाहत्यांच्या चेहऱ्यावर हसू आणलं. ती गोष्ट म्हणजे आरसीबीचा वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराज (Mohammed Siraj) याने अखेरच्या चेंडूवर लगावलेला 'हेलिकॉप्टर शॉट'. 


चेन्नईने समोर ठेवलेल्या 217 धावांच्या बलाढ्य लक्ष्याचा पाठलाग करता बंगळुरुचे फलंदाज खास कामगिरी करु शकले नाहीत. त्यामुळे अखेरच्या काही षटकात आरसीबी संघावर फार मोठा ताण आला. त्यांना 217 धावांचे लक्ष्य अखेरच्या षटकात पार करणं बरच अवघड झालं. अशात अखेरच्या चेंडूवर 27 धावांची गरज असताना क्रिजवर असलेल्या सिराजलाही हे करणं शक्य नसल्याचं माहित असताना देखील त्याने एक दमदार शॉट खेचत चौकार लगावला. विशेष म्हणजे हा शॉट हेलिकॉप्टर शॉट असून धोनी खेळत असलेल्या चेन्नई संघाविरुद्ध त्याने हा शॉट खेचल्याने दोन्ही संघाच्या चाहत्यांच्या चेहऱ्यावर हसू उमटलं. या सर्वानंतर विविध मीम्स देखील शेअर होऊ लागले असून यातील काही खास मीम्स पाहूया...   





बंगळुरुचा 23 धावांनी पराभव


आयपीएलच्या 15 व्या हंगामातील सलग चार सामने गमावल्यानंतर चेन्नईनं पहिला विजय नोंदवला आहे. या सामन्यात बगंळुरूचा कर्णधार फाफ डू प्लेसिसनं (Faf du Plessis) नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर फलंदाजी करण्यासाठी मैदानात आलेल्या चेन्नईच्या संघानं 20 षटकात दोन विकेट्स गमावून 217 धावा केल्या. प्रत्युरात मैदानात उतरलेल्या बंगळुरूच्या संघाला 20 षटकात 9 विकेट्स गमावून 193 धावापर्यंत मजल मारता आली. 


महत्त्वाच्या इतर बातम्या :