IPL 2022: आयपीएलच्या पंधराव्या हंगामात (Indian Premier League 2022)  गुजरात टायटन्सनं (Gujarat Titans) दमदार कामगिरी करून दाखवली आहे. हार्दिक पांड्याच्या (Hardik Pandya) नेतृत्वाखाली गुजरात टायटन्सनं सहा पैकी पाच सामन्यात विजय मिळवला आहे. तर, केवळ एकच सामना गमावला आहे. या कामगिरीसह गुजरातचा संघ गुणतालिकेत अव्वल स्थानी आहे. गुजरातची कामगिरी अशीच सुरू राहिल्यास तो प्लेऑफमध्ये सर्वात प्रथमच क्लालिफाय करणारा संघ ठरू शकतो. दरम्यान, हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाचं ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार ब्रॅड हॉगनं (Brad Hogg) कौतूक केलं आहे. 


या हंगामात हार्दिक पांड्या केवळ उत्कृष्ट कर्णधारच नाहीतर त्यानं फलंदाजी आणि गोलंदाजीनीही धमाल केली आहे. हार्दिकनं आतापर्यंत पाच सामने खेळले आहेत. ज्यात 228 धावा केल्या आहेत. तर, चार विकेट्स घेतल्या आहेत. हार्दिक पांड्याची कामगिरी पाहून ब्रॅड हॉगनं त्याला या हंगामातील सर्वोत्तम कर्णधार असल्याचं म्हटलं आहे. यामागचं कारणही त्यांनी सांगितलं आहे. भविष्यात हार्दिक पांड्या भारतीय संघाचं कर्णधारपदाची जबाबदारी संभाळू शकतो, असंही त्यांनी म्हटलं आहे. 


ब्रॅड हॉगनं आपल्या यूट्यूब चॅनलवर बोलताना असं म्हटलंय की, "संघ अडचणीत असताना हार्दिक पांड्या संघाचा आत्मविश्वास वाढण्याचं काम करतो आणि स्वत: पुढाकार घेऊन संघाचं नेतृत्व करतो. हार्दिक पांड्यानं उत्कृष्ट गोलंदाज आहे. संघाला गरज असताना त्यानं गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानं घेतलेले निर्णय यशस्वीही ठरले आहेत." आयपीएलचा पंधरावा हंगाम सुरू होण्यापूर्वी हार्दिक पांड्याच्या फिटनेसवर बरेच प्रश्न उपस्थित केले गेले होते. महत्वाचं म्हणजे, आयपीएलच्या मागच्या हंगामात त्यानं गोलंदाजी केली नव्हती. पण यावेळी तो फलंदाजीसह गोलंदाजीनंही कमाल दाखवत आहे.


हे देखील वाचा-