DC vs RR, IPL 2022: दिल्ली कॅपिटल्सचा ( Delhi Capitals) डावखुरा गोलंदाज चेतन सकारियाला (Chetan Sakariya) अद्याप एकाही सामन्यात खेळण्याची संधी मिळाली नाही. दिल्लीच्या संघाच्या निर्णयानं अनेक तज्ञांना आश्चर्यचकित केलं आहे. आयपीएलच्या पंधराव्या हंगामात एकही सामना खेळता न आल्यानं चेतन सकारियानं नाराजी व्यक्त केली आहे. याचदरम्यान, त्यानं जेम्स अंडरसनची आत्मकथा असलेल्या 'जिमी: माय स्टोरी' पुस्तकातील एक परिच्छेद सोशल मीडियावर शेअर करत खंत व्यक्त केली आहे.


आयपीएल 2021 मध्ये चेतन सकारियाची जबरदस्त कामगिरी
आयपीएलच्या मागच्या हंगामात चेतन सकारियानं जबरदस्त कामगिरी करून दाखवली होती. त्यानं राजस्थानकडून खेळताना 14 सामन्यात 8.19 इकोनॉमी रेटनं 14 विकेट्स घेतले. मात्र, आयपीएलच्या मेगा ऑक्शनपूर्वी राजस्थानच्या संघानं त्याला रिलीज केलं. त्यानंतर मेगा ऑक्शमध्ये दिल्लीच्या संघानं त्याच्यावर 4.2 कोटींची बोली लावत त्याला संघात सामील करून घेतलं. दरम्यान, दिल्लीच्या संघानं आतापर्यंत सहा सामने खेळले आहेत. मात्र, अद्यापही चेतन सकारियाला संधी मिळाली नाही.


चेतन सकारियाचं ट्वीट-



भारताच्या श्रीलंका दौऱ्यात चेतन सकारियाची संघात निवड करण्यात आली होती. या दौऱ्यात त्यानं एक वनडे आणि दोन टी-20 सामने खेळले. त्यानंतर चेतन सकारियाला भारतीय संघात जास्त संधी मिळाली नाही. त्यानं सय्यद मुश्ताक ट्रॉफी, विजय हजारे ट्ऱॉफी आणि सौराष्ट्रकडून रणजी ट्रॉफी खेळली. महत्वाचं म्हणजे, सकारियानं त्याच्या अखेरच्या 'अ' श्रेणी क्रिकेट सामन्यात पाच विकेट्स घेतल्या आहेत. तर, त्यानं त्याच्या अखेरच्या रणजी ट्रॉफीत नऊ विकेट्स घेतल्या आहेत. 


हे देखील वाचा-