CSK vs MI: आयपीएल 2022च्या 33 व्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्ज मुंबई इंडियन्सशी (Chennai Super Kings Vs Mumbai Indians) भिडला. मुंबईच्या (Mumbai) डीवाय पाटील स्टेडियमवर (DY Patil Sports Academy) हा सामना खेळला गेला. या सामन्यात चेन्नईच्या संघानं तीन विकेट्स राखून मुंबईला पराभूत केलं. चेन्नईकडून माजी कर्णधार एमएस धोनीनं विजयी चौकार खेचत मुंबईला पराभूत केलं. त्यानंतर सोशल मीडियावर धोनीच्या नावाची चर्चा रंगली असून त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव केला जात आहे. दरम्यान, भारतीय खेळाडूंसह परदेशातील खेळाडूंनी धोनीच्या खेळीचं कौतूक केलं आहे. 


मुंबईविरुद्ध सामन्याच्या अखेरच्या षटकात चेन्नईच्या संघाला 6 चेंडूत 17 धावांची गरज होती. मात्र, या षटकातील पहिल्या चेंडूवर प्रिटोरियस बाद झाला. त्यानंतर चेन्नईला सामना जिंकून देण्याची संपूर्ण जबाबदारी धोनीच्या खांद्यावर आली. चेन्नईला विजयासाठी चार चेंडूत 16 धावांची आवश्यकता होती. जयदेव उनादकटच्या गोलंदाजीवर धोनीनं पहिला षटकार मारला, मग चौकार, त्यानंतर दोन धावा काढून त्यानं स्ट्राईक स्वत:जवळ ठेवली. अखेरच्या चेंडूवर चार धावांची गरज असताना धोनीनं चौकार मारून चेन्नईला विजय मिळवून दिला. त्यानंतर सोशल मीडियावर धोनी नावाचं वादळ आलं. 


धोनीनं या सामन्यात 13 चेंडूत 28 धावांची तुफानी खेळी केली. ज्यात 3 चौकार आणि एक षटकारांचा समावेश आहे. मुंबईविरुद्ध सामन्यात धोनीचा फिनिशिंग टच पाहून त्याच्या चाहत्यांमध्ये आनंदाचं वातावरण पाहायला मिळतंय.


वसीम जाफरचं ट्वीट-



वीरेंद्र सेहवागचं ट्वीट-



आर.पी. सिंहचं ट्विट-



मोहम्मद कैफचं ट्वीट-



हे देखील वाचा-