GT vs PBKS, Match Live updates : गुजरातनं सामना गमावला, पंजाबचा आठ विकेट्सनं विजय

आयपीएलमध्ये (IPL 2022) यंदाच्या हंगामातील 48 वा सामना गुजरात आणि पंजाब या दोघांमध्ये नवी मुंबईच्या डी.वाय. पाटील मैदानात पार पडणार आहे.

abp majha web team Last Updated: 03 May 2022 11:13 PM
GT vs PBKS : गुजरातनं सामना गमावला, पंजाबचा आठ विकेट्सनं विजय

मुंबईच्या (Mumbai) वानखेडे मैदानावर (Dr DY Patil Sports Academy) खेळण्यात आलेल्या आयपीएलच्या पंधराव्या हंगामातील 48 व्या सामन्यात पंजाब किंग्जनं गुजरात टायटन्सला आठ विकेट्सनं पराभूत केलं आहे. 

पंजाबला दुसरा झटका, भानुका राजपक्षे आऊट

गुजरातच्या संघानं दिलेल्या लक्ष्याचा पाठलाग करताना पंजाबच्या संघाला दुसरा झटका बसलाय. भानुका राजपक्षे 28 चेंडूत 40 धावा करून बाद झाला आहे. 

GT vs PBKS : पंजाबचा सलामीवीर बाद

पंजाबचा सलामीवीर जॉनी बेअरस्टो बाद झाला आहे. मोहम्मद शमीने त्याला तंबूत धाडलं आहे.

GT vs PBKS : गुजरातचं पंजाबसमोर 144 धावाचं लक्ष्य

गुजरात संघाने साई सुदर्शनच्या नाबाद 64 धावांच्या मदतीने 144 धावांचे लक्ष्य समोर ठेवले आहे.

GT vs PBKS : राशिद शून्यावर बाद

रबाडाने राशिद खान यालाही शून्य धावांवर तंबूत धाडलं आहे.

GT vs PBKS : साईसुदर्शनचं अर्धशतक पूर्ण

गुजरातचे एक-एक फलंदाज बाद होत असताना साई सुदर्शन या युवा खेळाडूने टिकून खेळत अर्धशतक पूर्ण केलं आहे.

GT vs PBKS : राहुल तेवतियाही बाद, गुजरातचा निम्मा संघ तंबूत परत

रबाडाने आणखी एक विकेट मिळवत राहुलला 11 धावांवर तंबूत धाडलं आहे.

गुजरातच्या संघानं चौथी विकेट्स गमावली

पंजाब किंग्जविरुद्ध सामन्यात गुजरातच्या संघानं चौथी विकेट्स गमावली आहे. डेव्हिड मिलर 11 धावा करून बाद

GT vs PBKS : गुजरातला पहिला झटका

गुजरातचा सलामीवीर शुभमन गिल 9 धावा करुन धावचीत झाला आहे. 

GT vs PBKS : गुजरातचे सलामीवीर मैदानात

गुजरातकडून रिद्धिमान साहा आणि शुभमन गिलं मैदानात आले असून 2 षटकानंतर संघाचा स्कोर 17/0 आहे.

GT vs PBKS : पंजाब अंतिम 11

मयांक अग्रवाल (कर्णधार),शिखर धवन, भानुका राजपक्षे, लियाम लिव्हिंगस्टोन, जॉनी बेयस्टो, जितेश शर्मा, ऋशी धवन, कगिसो रबाडा, राहुल चाहर, अर्शदीप सिंह, संदीप शर्मा   


 

GT vs PBKS : गुजरात अंतिम 11

रिद्धिमान साहा (विकेटकीपर), शुभमन गिल, हार्दिक पांड्या (कर्णधार), साई सुदर्शन, डेविड मिलर, राहुल तेवतिया, राशिद खान, अल्जारी जोसेफ, लॉकी फर्ग्यूसन, प्रदीप सागवान, मोहम्मद शमी


 

GT vs PBKS : गुजरात संघानं आजही निवडली पहिली फलंदाजी

गुजरात टायटन्स संघानं नुकतीच नाणेफेक जिंकली असून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.

GT vs PBKS :  पंजाब संभाव्य अंतिम 11

मयांक अग्रवाल (कर्णधार),शिखर धवन, भानुका राजपक्षे, लियाम लिव्हिंगस्टोन, जॉनी बेयस्टो, जितेश शर्मा, ऋशी धवन, कगिसो रबाडा, राहुल चाहर, अर्शदीप सिंह, संदीप शर्मा  

GT vs PBKS : गुजरात संभाव्य अंतिम 11

रिद्धिमान साहा (विकेटकीपर), शुभमन गिल, हार्दिक पांड्या (कर्णधार), अभिनव मनोहर, डेविड मिलर, राहुल तेवतिया, राशिद खान, अल्जारी जोसेफ, लॉकी फर्ग्यूसन, यश दयाल, मोहम्मद शमी

GT vs PBKS : आज टेबल टॉपर मैदानात

यंदाच्या आयपीएलमधील (IPL 2022) टेबल टॉपर गुजरात टायटन्स आज मैदानात उतरणार आहेत. त्यांच्यासमोर पंजाब किंग्स संघाचं आव्हान असेल.

पार्श्वभूमी

GT vs PBKS, Live Score : यंदाच्या आयपीएलमधील (IPL 2022) टेबल टॉपर गुजरात टायटन्स आज मैदानात उतरणार आहेत. आजचा 48 वा सामना गुजरात टायटन्स विरुद्ध पंजाब किंग्स (GT vs PBKS)असा पार पडणार आहे. आज मैदानात उतरणाऱ्या गुजरातने आतापर्यंत 9 पैकी 8 सामने जिंकत सर्वात वर स्थान मिळवलं असून त्यामुळेच आजचा विजय त्यांचं पुढील फेरीचं तिकिट जवळपास निश्चित करेल. दुसरीकडे पंजाब संघाने 9 पैकी 4 सामने जिंकल्याने ते गुणतालिकेत थेट आठव्या स्थानावर आहेत.    


आजचा सामना नवी मुंबईच्या डी.वाय. पाटील मैदानात (D.Y. Patil Stadium) पार पडणार आहे. आतापर्यंत या ठिकाणी पार पडणाऱ्या सामन्यांमध्ये फलंदाजासह गोलंदाजांना मदत मिळाल्याने सामने चुरशीचे होत आहे. मोठी धावसंख्या उभी राहत नसली तरी सामना अटीतटीचा होत आहे.  आजचा सामना सायंकाळच्या सुमारास होणार असल्याने दुसऱ्यांदा गोलंदाजी करणाऱ्या संघाला दवाची अडचण येऊ शकते, त्यामुळे नाणेफेक जिंकणारा सामना प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेण्याची दाट शक्यता आहे.


गुजरात संभाव्य अंतिम 11


रिद्धिमान साहा (विकेटकीपर), शुभमन गिल, हार्दिक पांड्या (कर्णधार), अभिनव मनोहर, डेविड मिलर, राहुल तेवतिया, राशिद खान, अल्जारी जोसेफ, लॉकी फर्ग्यूसन, यश दयाल, मोहम्मद शमी


पंजाब संभाव्य अंतिम 11


मयांक अग्रवाल (कर्णधार),शिखर धवन, भानुका राजपक्षे, लियाम लिव्हिंगस्टोन, जॉनी बेयस्टो, जितेश शर्मा, ऋशी धवन, कगिसो रबाडा, राहुल चाहर, अर्शदीप सिंह, संदीप शर्मा  


हे देखील वाचा-


- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.