GT vs MI : आज आयपीएलमध्ये (IPL 2022) यंदाच्या हंगामातील टेबल टॉपर असणारा गुजरात टायटन्सचा संघ मैदानात उतरणार आहे. त्यांच्यासमोर मुंबई इंडियन्स (Gujrat Titans vs Mumbai Indians) असणार आहे. मुंबई गुणतालिकेत सर्वात खाली असून त्यांनी 9 पैकी तब्बल 8 सामने गमावले आहेत. तर गुजरातने मात्र 10 पैकी 8 सामने जिंकत गुणतालिकेत अव्वल स्थान मिळवलं आहे. 


आज होणाऱ्या गुजरात टायटन्स आणि मुंबई इंडियन्स (GT vs MI) या सामन्यात दोन्ही संघाकडून विजयासाठी शर्थीचे प्रयत्न केले जाणार यात शंका नाही. गुजरात संघाने आतापर्यंत दमदार कामगिरी केली असली तरी मागील सामन्यात पंजाबने त्यांना मात दिली. दुसरीकडे मुंबईने सलग 8 सामने गमावल्यानंतर मागील सामन्यात दमदार राजस्थान संघाला मात दिली. त्यामुळे गुजरातला आज मुंबईचं आव्हान अवघड पडू शकतं. तर आजचा हा सामना कधी आणि कुठे पाहू शकता, याबद्दल आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. 


कधी आहे सामना?


आज 6 मे रोजी होणारा गुजरात टायटन्स आणि मुंबई इंडियन्स यांच्यातील सामना भारतीय वेळेनुसार सायंकाळी 7 वाजून 30 मिनिटांनी सुरु होईल. 7 वाजता नाणेफेक होईल.  


कुठे आहे सामना?


हा सामना मुंबईच्या ब्रेबॉर्न स्टेडियमवर खेळवला जाणार आहे.


कुठे पाहता येणार सामना?


गुजरात टायटन्स आणि मुंबई इंडियन्स यांच्यातील आजचा सामना स्टार स्पोर्ट नेटवर्कवर पाहता येणार आहे. वेगवेगळ्या भाषेतून सामना पाहता येणार आहे. तसेच हॉटस्टार अॅपवरही सामना पाहता येईल. याशिवाय https://marathi.abplive.com//amp येथेही तुम्हाला आयपीएलचे लाईव्ह कव्हरेज पाहाता येईल. 


हे देखील वाचा-