IPL 2022, GT vs DC : सलामिवीर फलंदाज शुबमन गिल याच्या अर्धशतकी खेळीच्या बळावर गुजरातने निर्धारित 20 षटकांत सहा गड्यांच्या मोबदल्यात 171 धावांपर्यंत मजल मारली. दिल्लीच्या गोलंदाजांनी ठराविक वेळेत विकेट घेत गुजरातच्या धावसंख्येला आवर घातला. दिल्लीकडून खलील अहमदने दोन विकेट घेतल्या. तर मुस्तफिजूर रेहमान याने तीन विकेट घेतल्या. दिल्लीला विजयासाठी 172 धावांचे आव्हान देण्यात आले आहे.  


नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजी करणाऱ्या गुजरातची सुरुवात अतिशय खराब झाली. मॅथ्यू वेड पहिल्याच षटकात माघारी परतला. तर विजय शंकरला मोठी खेळी करण्यात अपयश आले. विजय शंकर फक्त 13 धावांवर बाद झाला. एका बाजूला विकेट पडत असताना गिलने संयमी फलंदाजी केली. हार्दिक पांड्या आणि डेविड मिलरसोबत गिलने महत्वाची भागिदारी केली. पांड्या 31 धावांवर बाद झाला. 


गिलची संयमी फलंदाजी - 
सलामी फलंदाज शिबमन गिल याने संयमी आणि आक्रमक फलंदाजी करत अर्धशतक झळकावले. गिलने 46 चेंडूत 84 धावांची खेळी केली. आयपीएलमधील ही गिलची सर्वोच्च धावसंख्या झाली आहे. गिलने आपल्या या खेळीत चार षटकार आणि सहा चौकार लगावले. गिलने हार्दिक पांड्या आणि डेविड मिलरसोबत महत्वाच्या भागिदारी करत संघाचा डाव सावरला. एका बाजूला विकेट पडत असताना गिलने संयमी फलंदाजी केली. 


मॅथ्यू वेड-विजय शंकरचा प्लॉप शो - 
मॅथ्यू वेडला आपल्या लौकिकास साजेशी फलंदाजी करता आली नाही. अवघ्या एका धावेवर बाद झाला. तर दुसऱ्या क्रमांकावर आलेल्या विजय शंकरने संथ फलंदाजी केली. विजय शंकरने 20 चेंडूत 13 धावांची खेळी केली. 


मुस्तफिजूर रेहमानचा भेदक मारा - 
मुस्तफिजूर रेहमान याने भेदक मारा करत गुजरातच्या फंलदाजांना धावा काढण्याची संधी दिली नाही. मुस्तफिजूर रेहमानने पहिल्याच षटकात धोकादायक मॅथ्यू वेडला बाद करत दिल्लीला पहिले यश मिळवून दिले. मुस्तफिजूर रेहमानने चार षटकात 23 धावांच्या मोबदल्यात तीन विकेट घेतल्या. 


दिल्लीचे 11 शिलेदार (Delhi Capitals )
पृथ्वी शॉ, टीम शेफर्ट, मनदीप सिंह, ऋषभ पंत (कर्णधार/विकेटकिपर), रोमेन प़वेल, ललीत यादव, अक्षर पटेल, शार्दूल ठाकूर, कुलदीप यादव, खलील अहमद, मुस्तफिजूर रहमान  




 



गुजरातचे 11 शिलेदार 
शुबमन गिल, मॅथ्यू वेड (विकेटकिपर), विजय शंकर, अभिनव मनोहर, हार्दिक पांड्या (कर्णधार), डेविड मिलर, राहुल तेवातिया, राशिद खान, वरुण अॅरोन, लॉकी फर्गुसन, मोहम्मद शामी