MI vs RR: आयपीएलच्या पंधराव्या हंगामातील नववा सामना मुंबई (Mumbai Indians) आणि राजस्थान (Rajasthan Royals) यांच्यात आज नवी मुंबईतील डी वाय पाटील स्टेडियमवर खेळवला जातोय. दरम्यान, फलंदाजीसाठी उतरलेल्या राजस्थानचा सलामीवीर जॉस बटलरनं झुंजार शतक ठोकलं. या सामन्यात जॉल बटलरनं मुंबईच्या गोलंदाजांना सळो की पळो करून सोडलं. या सामन्यातील चौथ्या षटकात जॉस बटलरनं मुंबईचा गोलंदाज बसिल थंपीची चांगलीच धुलाई केली. बसिल थंपीच्या षटकात त्यानं 26 धावा काढल्या. यानंतर सोशल मीडियावर मीम्स व्हायरल होऊ लागले आहेत.
मुंबईचा कर्णधार रोहित शर्माने चौथे षटक बासिल थम्पीला दिले. थंपीसमोर जोस बटलर होता. पहिल्या चेंडूवर त्यानं एकही धाव दिली नाही. यानंतर बटलरने दुसऱ्या चेंडूवर चौकार मारला. यानंतर बटलरनं तिसऱ्या आणि चौथ्या चेंडूवर सलग दोन षटकार मारले. पाचव्या चेंडूवरही बटलरने पुन्हा चौकार मारला. त्यानंतर शेवटच्या म्हणजे सहाव्या चेंडूवर बटलरनं पुन्हा षटकार ठोकला. अशा प्रकारे जोस बटलरनं बेसिल थम्पीच्या एका षटकात 26 धावा केल्या आहेत.
संघ-
राजस्थानचा संघ: जोस बटलर, यशस्वी जायसवाल, संजू सॅमसन (कर्णधार/विकेटकीपर), देवदत्त पडिक्कल, शिमरोन हेटमायर, रियान पराग, रविचंद्रन अश्विन, युजवेंद्र चहल, ट्रेंट बोल्ट, नवदीप सैनी, प्रसिद्ध कृष्णा.
मुंबईचा संघ: रोहित शर्मा (कर्णधार), ईशान किशन (विकेटकीपर), अनमोलप्रीत सिंह, तिलक वर्मा, कायरन पोलार्ड, टिम डेविड, डेनियल सॅम्स, मुरुगन अश्विन, जसप्रीत बुमराह, टाइमल मिल्स, बसील थम्पी.
हे देखील वाचा-
- IPL 2022, GT vs DC Match LIVE Updates : गुजरात आणि दिल्ली सामन्याचं लाईव्ह अपडेट्स
- Joss The Boss : बटलरने मुंबईविरोधात झळकावलं वादळी शतक
- SRK on Andre Russell: आंद्रे रसलच्या वादळी खेळीचं किंग खानकडून कौतूक, म्हणाला...
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha